भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मलिका विजय(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS )यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना अॅडेलमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 2 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह तीन सामन्यांची मलिका 2-0 अशी जिंकली आहे. भारताने दिलेल्या 264 धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स गमावून पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 74 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या.
सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीला पाचारण केले. मार्शचा हा निर्णय योग्य ठरला आणि भारताने कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांना लवकर गमावले. त्यानंतर रोहित शर्माने 97 चेंडूत 73 धावा आणि श्रेयस अय्यरने 77 चेंडूत सात चौकारांसह 61 धावा केल्या आणि संघाचा डाव सावरला. अक्षर पटेलने देखील अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करत 41 चेंडूत 44 धावा केल्या. हर्षित राणा 24 , अर्शदीप सिंग 13 यांनी महत्वाचे योगदान दिले आणि भारताला 264 धावसंख्येपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने चार बळी टिपले, तर झेवियर बार्टलेटने तीन विकेट, तर मिचेल स्टार्कने दोन विकेट घेतल्या.
भारताने दिलेल्या 265 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलिया पहिली विकेट 30 धावांवर मिशेल मार्शच्या रूपात गामावली. त्याला 11 धावांवर अर्शदीप सिंगने माघारी पाठवले. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडला हर्षित राणाने 28 धावांवर असताना बाद केले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्टने डाव सांभाळत शानदार अर्धशतक झळकवले. तो 78 चेंडूत 74 धावा करून हर्षित राणाचा शिकार ठरला. त्यानंतर मॅथ्यू रेनशॉ 30, अॅलेक्स केरी 9 धावा, हे बाद झाल्यावर कूपर कॉनोलीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सूत्रे हातात घेतली आणि नाबाद 61 धावा केल्या. मिशेल ओवेनने देखील 36 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली.
शेवटी एकवेळ वाटलं भारत हा सामना जिंकणार परंतु, ऑस्ट्रेलियाने भारताला संधि दिली नाही. झेवियर बार्टलेट 3, मिशेल स्टार्क 4 धावा काढून बाद झाले तर कूपर कॉनोली 61 धावा आणि अॅडम झांपा 0 धावांवर नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग,आणि हर्षित राणा यांनी पप्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताचा प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
हेही वाचा : PAK vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ODI मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! ‘या’ खेळाडूंची लागली वर्णी
ऑस्ट्रेलियाचा संघ प्लेइंग इलेव्हन
मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मॅथ्यू रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, अॅडम झांपा, जोश हेझलवुड, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक) आणि झेवियर बार्टलेट.