फोटो सौजन्य - ANI/सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे ८४ खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये सर्वात जास्त ॲथलेटिक्सची संख्या होती. भारताच्या पॅरा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत २९ पदकांची पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कमाई केली. यामध्ये सात सुवर्णपदक, ९ रौम्य पदक आणि १३ कांस्यपदकांचा समावेश आहे. याआधी भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १९ पदकांची कमाई केली होती. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारत मेडल टॅलीमध्ये १८ व्या स्थानावर आहे. मात्र, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर भारतीय पॅरा ॲथलीट आपल्या देशात परतले आहेत. आज पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
#WATCH | India’s #Paralympics2024 contingent leaves from their hotel in Delhi to meet Prime Minister Narendra Modi.
India stood at the 18th position in the points table, with a total of 29 medals – 7 golds, 9 silvers and 13 bronze. pic.twitter.com/xp8GRdDnnY
— ANI (@ANI) September 12, 2024
पदक जिंकल्यानंतर भारताचे पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसाठी बस ठेवण्यात आली आहे. संदर्भात काही व्हिडीओ सोशल मीडियावर आले आहेत. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी सिमरन शर्मा म्हणाली की, ही संघासाठी अभिमानाची बाब आहे कारण ते पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. ते म्हणाले की खूप छान वाटते. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही खेळायला जाण्यापूर्वीच पंतप्रधानांनी आमच्याशी चर्चा केली होती. तो खेळाडूंना विशेष वाटतो. कदाचित त्यामुळेच आम्हाला खूप पाठिंबा मिळत आहे आणि पदकतालिकेत सुधारणा होत आहे आणि आम्ही 29 पदके जिंकली. मी माझे स्पाइक्स भेट देत आहे, जे मी धावताना वापरले होते.
भारताचा दिग्गज भालाफेकपटू सुमित अंतिल म्हणाला की, पंतप्रधान मोदींनी आम्हाला यापूर्वीही खूप प्रेरणा दिली आहे. तो म्हणाला की संपूर्ण टीम खूप आनंदी आणि उत्साहित आहे. जाण्यापूर्वीच त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली होती. त्यांनी ज्या पद्धतीने खेळाडूंना सपोर्ट केला आहे, ते एका कुटुंबासारखे वाटते.