फोटो सौजन्य - Punjab Kings सोशल मीडिया
Punjab Kings vs Kolkata Knight Riders match report : कर्णधार अजिंक्य रहाणेला लाजिरवाणे पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या हंगामात आपल्या नेतृत्वाखाली केकेआरला चॅम्पियन बनवणारा अय्यर कोलकाताविरुद्ध फलंदाजीने काही खास कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सला पंजाब किंग्सने १६ धावांनी केलं पराभूत. इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात अय्यरचा ट्रम्प कार्ड असलेल्या हर्षित राणाने पंजाबच्या कर्णधाराला बाद केले. अय्यरचा डाव फक्त १ चेंडूत संपला. आयपीएल २०२५ मध्ये पहिल्यांदाच श्रेयस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही आणि १० षटकांतच अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला.
कोलकाता नाईट रायडर्स चा फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघाचे सलामी वीर फलंदाज क्विंटन डी कॉक आणि सुनील नारायण हे दोघेही आज फलंदाजीत फेल ठरले. डी कॉक चार चेंडूकडे यामध्ये त्याने फक्त दोन धावा केल्या. तर धुवाधार फलंदाजी करणारा सुनील नारायण ने चार चेंडू खेळला यामध्ये त्याने पाच धावा केल्या आणि मार्क जन्सनने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. अंगकृष रघुवंशी याने २८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. रहाणे मोठी कामगिरी करू शकला नाही.
Match 31. Punjab Kings Won by 16 Run(s) https://t.co/sZtJIQoElZ #PBKSvKKR #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
पंजाब किंग्ससाठी युझवेंद्र चहलने संघासाठी चार विकेट्स घेतले. अंगकृष रघुवंशी, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह आणि रमनदीप सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मार्क जन्सनने संघासाठी ३ विकेट्स घेतले. झेवियर बार्टलेट, ग्लेन मॅक्सवेल, अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
मुल्लानपूरमधील नाणेफेक पंजाब किंग्जच्या बाजूने उलटली आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन यांनी वादळी सुरुवात केली आणि ३.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ३९ धावा केल्या. मात्र, यानंतर हर्षित राणाने एकाच षटकात पंजाबला दोन मोठे धक्के दिले. हर्षितने प्रथम प्रियांशचा डाव संपवला आणि त्याला २२ धावांवर बाद केले. यानंतर, क्रीजवर आलेला कर्णधार श्रेयस अय्यरही २ चेंडू खेळून बाद झाला. अय्यरने हर्षितविरुद्ध मोठा फटका मारला पण शेवटी त्याने रमणदीप सिंगला एक सोपा झेल दिला. श्रेयसला खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आलेला जोश इंगलिस फलंदाजीने काही खास कामगिरी करू शकला नाही आणि फक्त २ धावा करून बाद झाला. १५ चेंडूत ३० धावा काढल्यानंतर प्रभसिमरन हर्षितचा तिसरा बळी ठरला. अँरिच नॉर्टजेच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात १० धावा काढल्यानंतर नाहेल वधेरानेही आपली विकेट गमावली. ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा त्याच्या कामगिरीवर निराशा केली आणि त्याला फक्त ७ धावा करता आल्या. सूर्यांश शेडगेलाही मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही आणि तो ४ धावा करून बाद झाला.