ॲश्ले गार्डनर आणि स्मृती मानधना(फोटो-सोशल मीडिया)
RCB vs GG, WPL 2026 : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि गुजरात जायट्स यांच्यात सामना होत आहे. या सामान्यापूर्वी गुजरात जायट्स संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ फलंदाजी करताना दिसणार आहे. ॲशले गार्डनरच्या नेतृत्वाखालील जीजीने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यात या संघाने विजय तर एकसामना गमावला आहे. यावेळी विजय मिळवून आपली कामगिरी सुधारण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरेल. तर आरसीबीने या स्पर्धेत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे तिसरा विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठण्याचे त्यांचे ध्येय असणार आहे.
टॉस जिंकल्यावर गुजरात जायट्सची कर्णधार ऍशले गार्डनर म्हणाली की, “आम्ही आज रात्री गोलंदाजी करणार आहोत. मला वाटते की प्रक्रियेच्या बाबतीत आमच्यासाठी काहीही बदलत नाही. या मैदानावर, गोलंदाजीसाठी तुम्हाला दोन किंवा तीन पर्यायांची गरज असते कारण फलंदाजीसाठी ही खेळपट्टी खूप चांगली असून आम्ही आमच्या गोलंदाजीच्या सुरुवातीलाच खूप स्पष्ट असले पाहिजे, की आम्ही धावा रोखण्याचा प्रयत्न करत आहोत की विकेट्स घेण्याचा. शिवानी सिंग आज पदार्पण करत आहे.”
आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने टॉस गमावल्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ती म्हणाली की,” नाणेफेक कधीच तुमच्या नियंत्रणात नसते. मला वाटते की स्पर्धेच्या सुरुवातीलाच वेगवेगळ्या परिस्थितींचा अनुभव घेणे चांगले आहे. जर तुम्ही सुरुवातीला गोलंदाजी करत राहिलात आणि नंतर तुम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागली, तर त्याचा फायदा होतो. मी यावर खूश आहे. ग्रेस (हॅरिस) च्या बाबतीत, तिला फलंदाजी कशी करायची हे सांगण्याची गरज नाही, ती तिच्या पद्धतीनेच फलंदाजी करते. आमच्या सर्वांसाठी, आम्ही जे नियोजन केले आहे त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. जर आम्हाला अँकरची भूमिका बजावण्याची गरज पडली, तर आम्ही ते देखील करू शकलो पाहिजे. आम्हाला सकारात्मक आणि आक्रमक क्रिकेट खेळायचे असून मी असे म्हणणार नाही की पुढे जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. आम्ही त्याच संघासोबत खेळणार आहोत.”
आरसीबीचा प्लेइंग ११ : ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), दयालन हेमलता, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल
जीजीची प्लेइंग ११ : बेथ मुनी (डब्ल्यू), सोफी डेव्हाईन, ॲशले गार्डनर (क), शिवानी सिंग, जॉर्जिया वेरेहम, कनिका आहुजा, भारती फुलमाली, काशवी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर






