फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru/Rajasthan Royals
RCB vs RR Toss Update : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आयपीएल २०२५ चा ४२ वा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात राजस्थान आणि बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. बंगळुरूचे नेतृत्व रजत पाटीदार करेल, तर दुखापतीमुळे संजू सॅमसन संघाबाहेर आहे, त्यामुळे राजस्थानचे नेतृत्व रियान पराग करणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयलने या स्पर्धेमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे आतापर्यत फक्त २ सामने जिंकले आहेत. तर बंगळुरूच्या संघाने मागील सामन्यात पंजाबचा पराभव केला होता.
आज संजू सॅमसनच्या जागेवर आणखी एकदा वैभव सूर्यवंशीला संघामध्ये स्थान मिळाले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याला चालू सामना दुखापतीमुळे सोडावा लागला होता आणि त्याला रिटायर आऊट करण्यात आले होते त्यानंतर तो पुन्हा खेळला नाही. विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे मागील सामन्यांमध्ये त्याने कमालीचा खेळ दाखवला होता त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आणखी एक मोठ्या खेळीची आज अपेक्षा आहे. फिल्ल सॉल्ट संघाला धुव्वादार सुरुवात करून देण्यात कोणतीही कसर सोडत नाही त्यामुळे संघाला त्याची मदत होती त्यामुळे राजस्थानला त्याचा लवकर विकेट घेणे गरजेचे आहे.
🚨 Toss 🚨@rajasthanroyals elected to field against @RCBTweets
Updates ▶️ https://t.co/mtgySHh88K #TATAIPL | #RCBvRR pic.twitter.com/8JwwIHyOmh
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025
आज महेशला न संधी देता फझहलक फारुकी प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे आजच्या कामगिरीवर नजर असणार आहे. मागील सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाब विरुद्ध कमालीची कामगिरी केली होती. मागील सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी याला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली होती त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता आणि क्रिकेट चाहत्यांची मन जिंकली होती त्यामुळे आजच्या कामगिरीवर प्रेक्षकांनाची नजर असेल. नितीश राणाने देखील या सीझनमध्ये दोन अर्धशतक झळकावले आहेत त्यामुळे आज त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. राजस्थानचा संघ संजू सॅमसनच्या उपस्थितीत कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
Pahalgam Terror Attack नंतर राजीव शुक्ला यांचा मोठं विधान! भारत आणि पाकिस्तानमध्ये यापुढे द्विपक्षीय मालिका होणार नाही
फिल साल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकिपर), रोमारियो शेफर्ड, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड.
यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, रियान पराग (कॅप्टन), नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, फझहलक फारुकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.