भुवनेश्वर कुमार(फोटो-सोशल मिडिया)
RCB vs SRH : आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनराइझर्स हैदराबादकडून ४२ धावांनी पराभूत व्हावे लागले आहे. हा सामना लखनऊच्या श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या संघाने ६ गडी गमावत २३१ धावा केल्या होत्या. या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ १८९ धावांतच गारद झाला. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभव जरी स्वीकारावा लागला तरी बंगळुरुच्या वेगवान गोलंदज भुवनेश्वर कुमारने एक विक्रम रचला आहे.
वेगवान गोलंदज भुवनेश्वर कुमारने असा पराक्रम केला आहे. जो कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने पहिल्यांदाच करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार हा भारतातील टी-२० क्रिकेटमध्ये २५० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. भारतात टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम पियुष चावलाच्या नावावर आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये २८९ विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर युजवेंद्र चहल २८७ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमारने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४ षटकांत ४३ धावा देत एक बळी घेतला. त्याने ट्रॅव्हिस हेडची विकेट घेत हा इतिहास रचला आहे.
भुवनेश्वर कुमारच्या टी-२० कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, या तो ३०५ सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने ३२२ विकेट्स घेतल्या आहेत. या खेळाडूचा इकॉनॉमी रेट देखील कमी म्हणजे ७.३२ राहिला आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे कुमार पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करतो, तरीही तो संघासाठी खूप फायदेशिर ठरतो. आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमारने १८७ सामन्यांमध्ये १९४ विकेट्स मिळवल्या आहेत.
भुवनेश्वर कुमार मागील तीन वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. भुवनेश्वर टीम इंडियाकडून शेवटचा सामना २०२२ मध्ये खेळला होता, तेव्हापासून भुवीचे संघात पुनरागमन झाले नाही. दुखापतीने त्याला ग्रासले आणि त्याचा खेळ बिघडत गेला. पण त्याच्या चांगल्या कामगिरीनंतरही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तरी देखील हा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये त्याची कमाल दाखवत आहे.
हेही वाचा : Jasprit Bumrah : असा कारनामा करणारा जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू! आकडे पाहून बसेल धक्का
आयपीएलच्या ६५ व्या सामन्यात सनराइझर्स हैदराबादने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला ४२ धावांनी पराभूत केले. हा सामना लखनऊच्या श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादने इशान किशनने ९४ धावांच्या जोरावर २३१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ केवळ १८९ धावांच करू शकला.