फोटो सौजन्य : Mumbai Indians
जसप्रीत बुमराह : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा फक्त आयपीएल मध्येच नाही तर जगभरामध्ये त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. त्याने जगभरामध्ये त्याच्या कामगिरीने त्याची खास ओळख निर्माण केली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू असताना दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह याला स्पर्धा सोडावी लागली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये देखील तो सुरुवातीचे काही सामन्यांमध्ये खेळला नाही. आयपीएल मध्ये त्याने त्याने सातत्याने ज्याप्रकारे कामगिरी केली आहे. त्यानंतर सध्या तो जगातला सर्वात्कृष्ट वेगवान गोलंदाज ठरला आहे.
आता आयपीएलमध्ये त्याने आणखी एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे. आयपीएलमध्ये सातत्याने 15 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये जसप्रीत बुमरा ह्याचे नाव आता अव्वल स्थानावर नोंदविण्यात आले आहे. 2016 मध्ये जसप्रीत बुमराह याने 15 विकेट नावावर केले होते. तर 2017 मध्ये त्याने 20 विकेट्स घेतले होते. 2018 ला 6.89 च्या इकॉनोमीने त्याने 17 विकेट्स नावावर केले होते. 2019 मध्ये जसप्रीतने संघाला 19 विकेट्स मिळवून दिले होते.
Records. History. Jasprit Bumrah. 🤷♂️💥#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL pic.twitter.com/rLez2pfdyH
— Mumbai Indians (@mipaltan) May 23, 2025
2020 मध्ये जसप्रीत बुमराह यान संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतले होते. जसप्रीत बुमराह यांनी 2020 मध्ये 27 विकेट्स घेतले होते. तर 2021 मध्ये त्यांना 21 विकेट्सची कमाई केली होती. 2022 मध्ये 7.18 च्या इकॉनोमीने त्याने 15 विकेट्स नावावर केले होते. 2024 च्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर 6.48 च्या इकॉनोमीने गोलंदाजी करत वीस विकेट्स घेतले होते. या सीझनमध्ये देखील त्याने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये न खेळता देखील त्याने आत्तापर्यंत 16 विकेट्स नावावर केले आहेत आणि की एक सामना मुंबई इंडियन्स शिल्लक आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 मधील कामगिरीवर नजर टाकली तर संघाची सुरुवात ही फार काही चांगली झाले नाही. संघाने सलग तीन सामने सुरुवातीला गमावले होते. त्यानंतर मागील सामना हा संघाचा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झाला आणि या सामन्यात संघाने दिल्लीला वानखेडेच्या मैदानावर पराभूत करून प्लेऑफमध्ये स्थान आत्ता पक्के गेले आहे. संघाचे फलंदाजांनी त्याचबरोबर गोलंदाजांनी देखील या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आता शेवटचा सामना हा मुंबई इंडियन्स शिल्लक आहे या सामन्यात मुंबईचा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे.