फोटो सौजन्य : IndianPremierLeague
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद सामन्याचा अहवाल : राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु यांचा सामना आज सनराइझर्स हैदराबादविरुद्ध झाला, हा सामना लखनऊच्या सवाई मानसिंह स्टेडीयमवर खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजी करत हैदराबादच्या संघाने 232 धावा केल्या होत्या हे लक्ष्य बंगळुरुचा संघ पुर्ण करु शकला नाही त्यामुळे दुुसऱ्या स्थानावरच राहील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 42 धावांनी पराभूत केले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
आजच्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने संघाला कमालीची सुरुवात करुन दिली. या सामन्यात त्याने 25 चेंडुमध्ये 47 धावा केल्या यामध्ये त्याने 1 षटकार आणि 7 चौकार मारले. देवदत्त पडिक्कल याला दुखापतीमुळे स्पर्धा सोडावी लागली त्याच्या जागेवर मयंक अग्रवाल याला संघामध्ये संधी मिळाली होती. तर फिल्ल साॅल्ट याने आज या सिझनचे तिसरे अर्धशतक ठोकले. फिल्ल साॅल्ट याने आजच्या सामन्यात 32 चेंडुमध्ये 62 धावा केल्या, यात त्याने 5 षटकार आणि 4 चौकार मारले.
Jasprit Bumrah : असा कारनामा करणारा जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू! आकडे पाहून बसेल धक्का
संघाचा मुळ कर्णधार रजत पाटीदार हा फक्त फलंदाजीला आला होता, त्याने आजच्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले नाही. आजच्या सामन्यात तो फलंदाजीला आला पण तो धावबाद झाला. त्याने फक्त 16 चेंडुमध्ये 18 धावा केल्या. शेरफन रदरफर्ड फलंदाजीला आला पण तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. संघाचे नेतृत्व करणारा जितेश शर्मा आज मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला.
Sunrisers Hyderabad outclass RCB with a 42-run triumph — a strong all-round show from the Orange Army! 🔥#IPL2025 #RCBvSRH #Sportskeeda pic.twitter.com/z1ttQwVffX
— Sportskeeda (@Sportskeeda) May 23, 2025
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी धमाकेदार सुरुवात करून दिली. अभिषेक-हेडने पहिल्या विकेटसाठी ३.६ षटकांत ५४ धावा केल्या. अभिषेकने १७ चेंडूत ३ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. दरम्यान, हेड १७ धावा करून बाद झाला. यानंतर, इशान किशनने जबाबदारी घेतली आणि आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाला कठीण वेळ दिला. २०२५ च्या आयपीएलमध्ये १० डावांनंतर इशानने अर्धशतक झळकावले. इशानने त्याचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी २८ चेंडूंचा सामना केला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, इशानने आपला जबरदस्त फॉर्म घेतला आणि पुढील २० चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. इशानने ९४ धावांच्या नाबाद खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार मारले.