एबी डिव्हिलियर्स(फोटो-सोशल मीडिया)
Ab de villiers : जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांचे नावं जेव्हा समोर येतात तेव्हा साहजिक समोर एबी डिव्हिलियर्सचे नाव समोर येतं. त्याने त्याच्या त्याच्या काळातील सर्वात धोकादायक फलंदाज असणाऱ्या फलंदाजाबद्दल माहिती दिली आहे. एबीने ना क्रिस गेलचे, ना वीरेंद्र सेहवागचे नाव घेतले. तर एबी डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज असल्याचे म्हटले आहे. एबी पॉन्टिंगबद्दल बोलताना म्हणाला की, “मी माझ्या काळातील सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून रिकी पॉन्टिंगला पसंती देईल.”
एबी पॉन्टिंगबद्दल बोलताना म्हणाला की, “मला वाटते की रिकी पॉन्टिंगविरुद्ध खेळणे खूप कठीण आणि आव्हानात्मक होते. मला नेहमीच वाटायचे की तो जगातील सर्वात घातक फलंदाज आहे, त्याची फलंदाजी अद्भुत अशी होती. तो नेहमीच नियंत्रणात खेळायचा. तो क्रीजवर राहून संघाला विजय मिळवून देता असे. पॉन्टिंग खूप आक्रमक फलंदाज होता. तो गोलंदाजांवर हल्ला करण्यात पटाईत होता. जेव्हा तो फलंदाजी करत असायचा तेव्हा तो त्याचा खेळ सोपा करायचा.”
हेही वाच : IPL 2025 : RCB संघ विकला जाणार? आयपीएलच्या इतिहासात कधी नव्हे होणार महागडा करार, वाचा सविस्तर..
ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंगने १६८ कसोटी सामन्यांमध्ये १३३७८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ४१ शतके आणि ६२ अर्धशतके ठोकली आहेत. सतेच पॉन्टिंगने ३७५ एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये त्याने १३७०४ धावा केल्या आहेत. पॉन्टिंगने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३० शतके आणि ८२ अर्धशतके झळकावली आहेत. पॉन्टिंगने पर्थ येथे १९९५-९६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने ९६ धावा केल्या होत्या.
महेंद्रसिंग धोनी याला आयसीसी फेम ऑफ द हॉल यामध्ये सामील करण्यात येऊन त्याचा मोठा सन्मान करण्यत आला आहे. भारताच्या कर्णधारासह इतर विदेशी खेळाडूंना देखील हा सन्मान देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन महान सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन आणि न्युझीलँडचा महान फिरकी गोलंदाज डॅनियम विक्टरी याला सामील करण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि महान कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांच्या नावाचा देखील यामध्ये समावेश आहे. भारताच्या क्रिकेट जगतात आत्तापर्यंत 11 खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या आधी महिला क्रिकेट खेळाडू नीतू डेव्हिड, वीरेंद्र सेहवाग, डायना अडूलजी, विनू मंकड, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, कपिल देव, बिशन सिंग बेदी आणि सुनील गावस्कर या भारतीय खेळाडूंना आयसीसी हॉल ऑफ द फेम येथे सामील करण्यात आले होते.