भारत आणि इंग्लंड कसोटी सामना(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात असून या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणाऱ्या भारताने यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३५८ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेऊन भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले.
तत्पूर्वी भारताने पहिल्या दिवसा सुरवात सावधान केली होती. या सामन्यात भारताची सलामीवीर जोडी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली होती. पहिल्या दिवसाअखेर भारताने ४ विकेट्स गमावून २६४ धावा केल्या होत्या. दिवसाअखेर जडेजा १९ आणि ठाकूर १९ धावांवर नाबाद होते. दुसऱ्या दिवसाची सुरवात केली तेव्हा भारताने २६४ धावांमध्ये ९४ धावांची भर घातली आहे.
केएल राहुल ४६, यशस्वी जैस्वाल ५८, शुभमन गिल १२, साई सुदर्शन ६१, शुभमन गिल १२, रिषभ पंत ५४, रवींद्र जडेजा २०, शार्दूल ठाकूर ४१, वॉशिंग्टन सुंदर २७, अंशुल कंबोज ०, जसप्रीत बुमराह ४ धावा तर मोहम्मद सिराज ५ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने ७२ धावा देऊन सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. तर जॉफ्रा आर्चरने ३ विकेट्स घेतल्या, लियाम डॉसन आणि ख्रिस वोक्स यांनी पप्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग ११
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ११
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर