फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
Rohit Sharma Virat Kohli Celebration Video : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकून इतिहास रचला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडचा ६ चेंडू शिल्लक असताना ४ विकेट्सने पराभव केला. भारत सर्वाधिक वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा देश बनला. भारताने १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि त्याचा आनंद कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. दोन्ही अनुभवी खेळाडू खूप आनंदी होते आणि रो-को म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित-कोहलीने स्टंपसह दांडिया वाजवून विजय साजरा केला.
Rohit Sharma Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर निवृत्तीबाबत रोहितचे मोठे विधान; म्हणाला….
रोहित शर्मा आणि विराट कोहली दांडिया खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली ते मैदानामधील स्टंप घेऊन पिचवर दांडिया खेळत आहेत या या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
virat kohli and rohit sharma playing dandiya after winning champions trophy was not in my 2025 bucket list 😭 pic.twitter.com/dZsRRCU8Mt
— saif (@nightchanges) March 9, 2025
दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून भारतीय संघाने आपले नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे. भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा देश बनला. भारताने पहिल्यांदा २००२ मध्ये विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर तो श्रीलंकेसोबत संयुक्त विजेता बनला. यानंतर, २०१३ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले.
हा विजय भारतीय संघासाठीही खास होता कारण त्याने न्यूझीलंडकडून २५ वर्ष जुना बदला घेतला. २००० मध्ये आयोजित करण्यात आले चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ अंतिम सामन्यात होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामनाही खेळला गेला होता. त्यानंतर भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. २५ वर्षांनंतर दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले आणि यावेळी भारताने त्याचा बदला घेतला.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद जिंकून आपल्या खात्यात एक मोठी कामगिरी केली आहे. रोहित शर्मा एकापेक्षा जास्त आयसीसी ट्रॉफी जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. एमएस धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला. त्याच वेळी, रोहितच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.