फोटो सौजन्य - X
रोहित शर्मा Dream 11 : सध्या आयपीएलचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे. यामध्ये क्रिकेट चाहत्यांना आयपीएल सोबतच ड्रीम इलेव्हनला टीम लावण्यात फारच रस असतो. यामध्ये अनेक खेळाडू हे कोट्यावधी रुपये जिंकतात. त्याचबरोबर अनेकांना गाड्या देखील मिळतात. मागील बऱ्याच आठवड्यांपासून रोहित शर्मा एका जाहिरातीत म्हणत होता की तो ड्रीम इलेव्हनमध्ये जिंकणाऱ्या खेळाडूला लेम्बोर्गिनी देणार आहे. हे फक्त सांगण्यासाठीच नव्हे तर साक्षात असे घडले आहे. सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ड्रीम इलेव्हन जिंकणाऱ्या एका खेळाडूला रोहित शर्माने चक्क लॅम्बोर्गिनी भेट म्हणून दिली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि ड्रीम इलेव्हन जिंकणारा खेळाडू हे दोघेही लाम्बोर्गिनीची चावी घेऊन शोरूममध्ये दिसत आहेत. यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात रोहित शर्मा ड्रीम इलेव्हन जिंकणाऱ्या खेळाडूला प्रश्न विचारला आहे. यामध्ये रोहित शर्मा म्हणतो की कोणाला कॅप्टन बनवले होतेस. यावर ड्रीम 11 जिंकणारा खेळाडू म्हणतो मी कोलकाता नाईट रायडर्सचा नारायणला कॅप्टन बनवले होते. सध्या हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
The way Rohit Sharma is talking to these people.❤️
My Man @ImRo45 is so humble and simple that is why everyone love him so much.🥹✨🩵 pic.twitter.com/vgtTumTaOZ
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 19, 2025
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता तो फक्त भारतासाठी एक दिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्स संघ हा प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. संघाचे अजूनपर्यंत दोन सामने शिल्लक आहेत या दोन्ही सामन्यात संघाने जर विजय मिळवला तर संघाचे प्लेऑफमध्ये चौथे स्थान मिळवण्यात यशस्वी होईल. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. सध्या तो दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे त्याच्या पुढील दोन्ही सामन्यांमध्ये चाहत्यांचे लक्ष त्याच्या कामगिरीवर असणार आहे.