फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings match report : आज आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमनेसामने आले होते. हा सामना हैदराबादमध्ये खेळवण्यात आला. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने शानदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादला २४६ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. कर्णधार श्रेयस अय्यरने ८२ धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय प्रभसिमरन सिंगने ४२ आणि प्रियांश आर्यने ३६ धावा केल्या. या फलंदाजांच्या जोरावर संघाने मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी झाले होते. पण म्हणतात ना एक शेर तर दुसरा सव्वाशेर असच काही तरी पुढील सामन्यांमध्ये पाहायला मिळाले.
आजच्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर ट्रॅव्हिस हेडने संघासाठी ३७ चेंडूंमध्ये दमदार ६६ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने पंजाब किंग्सला हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर पाणी पाजलं आहे. अभिषेक शर्माने त्याचे आयपीएलचे पहिले शतक नावावर केले. त्याने ४० चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या तर संघासाठी अभिषेकने ५५ चेंडूंमध्ये १४१ धावा केल्या. यामध्ये त्याने चक्क १० षटकार आणि १४ चौकार ठोकले. त्यानंतर अर्शदीप सिंह याने त्याचा विकेट घेतला.
📸📸
“𝙏𝙝𝙞𝙨 𝙤𝙣𝙚 𝙞𝙨 𝙛𝙤𝙧 𝙩𝙝𝙚 𝙊𝙧𝙖𝙣𝙜𝙚 𝘼𝙧𝙢𝙮” ✍️@SunRisers fans, drop your reply to Abhishek’s note in one word 🧡
Updates ▶ https://t.co/RTe7RlXDRq#TATAIPL | #SRHvPBKS pic.twitter.com/wTECpG7Uzi
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
आजच्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. यामध्ये युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह या दोघांच्याच हाती फक्त १-१ विकेट लागली आहे. हैदराबादसाठी आज दोन गोलंदाजांनी विकेट घेतल्या यामध्ये हर्षल पटेलच्या हाती ४ विकेट लागले तर ईशान मलिगाने संघासाठी आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यात २ विकेट्सची कमाई केली.
मोहम्मद शमी आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा स्पेल टाकणारा दुसरा खेळाडू बनला आहे. या सामन्यात त्याने ४ षटकांत ७५ धावा दिल्या. या काळात त्याला कोणतेही यश मिळाले नाही. जोफ्रा आर्चर नंतर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणारा शमी दुसरा खेळाडू ठरला आहे. आर्चरने आयपीएलमध्ये त्याच्या स्पेलमध्ये ७६ धावा दिल्या होत्या. आता या यादीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नावही जोडले गेले आहे.