पॅट कमिन्स आणि जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
WTC Final : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू असून या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स चांगलाच चमकला आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. या कामगिरीसह पॅट कमिन्सने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.
कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या घातक गोलंदाजीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासाठी जोरदार कामगिरी केली आहे. कमिन्सने या सामन्यात चांगलाच कहर केला आणि ६ फलंदाजांना फक्त २८ धावांमध्ये माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्याने सर्वांना प्रभावित केले आहे.
हेही वाचा : ‘दुर्घटनेची बातमी ऐकून मला..’, Ahmedabad plane crash घटनेवर Virat Kohli ची शोकाकुल प्रतिक्रिया..
पॅट कमिन्सने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा क्रम उध्वस्त केला आहे. यासोबत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे ३०० बळी देखील पूर्ण केले आहेत. कमिन्स हा टप्पा गाठणारा सहावा कांगारू वेगवान गोलंदाज ठरला आहे. यासह, कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सायकलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने जसप्रीत बुमराहला देखील मागे टाकले आहे. या चक्रात बुमराहने ७७ विकेट घेतल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शेवटच्या सामन्यात एका डावात सहा विकेट घेणारा कमिन्स हा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे.
पॅट कमिन्सने पुन्हा एकदा कर्णधार म्हणून इतिहास लिहिला आहे. त्याने ९ व्यांदा एका डावात ५ विकेट घेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. या आकड्यासह त्याने बिशन सिंग बेदीला देखील पिछाडीवर टाकले आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर कर्णधार म्हणून सर्वोत्तम स्पेल टाकण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे. यासोबतच त्याने बॉब विलिसचा ३३ वर्षांचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या चार विकेट लवकर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी टेम्बा बावुमा आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : IPL 2025 मध्ये सुर हरवलेल्या Rashid Khan चा धक्कादायक निर्णय; क्रिकेटपासून स्वतःला केले अलिप्त..
दक्षिण आफ्रिकेने स्कोअरबोर्डवर ९४ धावा लावल्या होत्या. त्यानंतर पॅट कमिन्सचे वादळ आले. या कांगारू कर्णधाराने प्रथम टेम्बा बावुमाची ३६ धावांची लढाऊ खेळी संपवली. त्यानंतर त्याने काइल व्हेरिनला फक्त १३ धावांवर धावबाद केले. कमिन्सने मार्को जेन्सनला देखील आपली शिकार बनवले. एकटाच संघर्ष करत असलेला डेव्हिड बेडिंगहॅमही कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी गेला. शेवटी कमिन्सने रबाडाला फक्त १ धावेवर आऊट बाद केले आणि संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा डाव १३८ धावांवर गारद झाला.