रशीद खान(फोटो-सोशल मीडिया)
Rashid Khan’s shocking decision : १३ जूनपासून मेजर लीग क्रिकेट २०२५ ला सुरवात होत आहे. पण त्याआधी एमआय न्यू यॉर्क संघाला मोठा झटका बसला आहे. अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू लेग-स्पिनर रशीद खानने धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याच्या निर्णयाने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. अलिकडेच झालेल्या आयपीएल २०२५ च्या लीगमध्ये रशीद खानची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. या पार्श्वभूमीवर त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.
रशीद खान मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये एमआय न्यू यॉर्क संघाचा भाग असणार नाही. रशीद खानकडून अचानक क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तो या वर्षी एमएलसीमध्ये खेळताना दिसणार नाही. मागील एमएलसीच्या हंगामात तो एमआय न्यू यॉर्कसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याने गेल्या वर्षी ६.१५ च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटसह १० विकेट्स मिळवल्या होत्या. या स्पर्धेत त्याचा संघ सातपैकी फक्त दोन सामने जिंकून चौथ्या स्थानावर राहील होता. यावेळी रशीदची अनुपस्थिती एमआय न्यू यॉर्कसाठी बोचणार आहे.
हेही वाचा : SA vs AUS : WTC Final सामन्यात Pat Cummins चे वादळ घोंघावले! लॉर्ड्सवर ५० वर्षांनी केला भीम पराक्रम..
रशीद खानने क्रिकेटपासून किती काळ दूर राहणार आहे याबाबत अद्याप कोणती माहिती मिळू शकलेली नाही. परंतु रशीदने त्याच्या दीर्घ कारकिर्दीला लक्षात घेत ब्रेक घेण्याचा निर्णय केला आहे. रशीद खानने अलीकडेच आयपीएल २०२५ च्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसला होता. या स्पर्धेत त्याची कामगिरी खूपच खराब राहिली होती. त्याला केवळ ९ विकेट्स घेता आल्या होत्या. परंतु, त्याचा इकॉनॉमी रेट ९.३४ आणि त्याची सरासरी ५७.११ होती.
हेही वाचा : ‘दुर्घटनेची बातमी ऐकून मला..’, Ahmedabad plane crash घटनेवर Virat Kohli ची शोकाकुल प्रतिक्रिया..
गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवार १२ जून रोजी दुपारी एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबादमध्ये २४२ प्रवासी घेऊन जाणारे विमान अचानक कोसळले आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात ही घटना घडली असून अपघातात २४२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या दुर्घटनेनंतर जगभरातील विविध क्षेत्रातून भावुक प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेवर आता भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “अहमदाबादहून खूप दुःखद बातमी समोर आली आहे. या विमान अपघातात जीव गमावलेल्या सर्व लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना.”