ऑस्ट्रेलिया टीम(फोटो-सोशल मीडिया)
SA vs AUS : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियामध्ये खेळवले जाणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीत पोहोचला आहे. त्याच वेळी, या मालिकेची सुरवात टी-२० मालिकेने होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी खेळवला जाणार आहे.
या मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शकडून सलामी जोडीबद्दल मोठे विधान करण्यात आले आहे. मार्शने म्हटले आहे की, “पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत तो आणि ट्रॅव्हिस हेड या स्वरूपात डावाची सुरुवात करणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर, ऑस्ट्रेलियाकडे सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी पाच फलंदाज शर्यतीत आहेत, ज्यामध्ये मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क यांचा नंबर लागतो.
हेही वाचा : Rap case : ‘त्या’ पाकिस्तानी खेळाडूसोबतचा हार्दीक पांड्याचा व्हिडीओ आला समोर; वाचा चाहते काय म्हणाले?
मॅक्सवेलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये मार्शसोबत डावाची सुरुवात केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ट्रॅव्हिस हेडला विश्रांती दिली गेली होती. मार्श आणि हेड यांनी याआधी कधीहि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र सलामी करताना दिसले नाही. त्यांनी यापूर्वी एकदिवसीय सामन्यात सलामी दिलेली आहे. या जोडीची सरासरी ५० पेक्षा जास्त असून दोघांनीही आठ डावांमध्ये प्रति षटक १२ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या आहेत.
मार्शने शुक्रवारी डार्विनमध्ये पत्रकारांना सांगितले की, नजीकच्या भविष्यात फक्त हेड आणि मीच टॉप ऑर्डरमध्ये असणार आहोत. आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो असून आमचे चांगले संबंध आहेत. ३३ वर्षीय मार्श दुखापतीमुळे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा भाग राहू शकला नव्हता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत पुनरागमन करत संघाला ऐतिहासिक ५-० असा विजय मिळवून दिला आहे.
हेही वाचा : Karun Nair ला BCCI चा मोठा झटका! इंग्लंड दौऱ्यानंतर दुलीप ट्रॉफी 2025 मधून पत्ता कट; निवड समितीचा मोठा
मार्शकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनचा खुलासा करण्यात आला नाही. परंतु, टीम डेव्हिडला फलंदाजी क्रमानेवर पाठवण्याचे संकेत देण्यात आले आहे. टीम डेव्हिडने वेस्ट इंडिजमध्ये ३७ चेंडूत शतक झळकावले होते आणि सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या होत्या. डेव्हिडबद्दल बोलताना मार्श म्हणाला की, आम्ही फलंदाजी क्रमाबद्दल बोललो आहोत. .