सचिन तेंडुलकर(फोटो-सोशल मीडिया)
Sachin Tendulkar started the tradition of putting the tricolor on helmets : भारतातीलच नाही तर क्रीडा जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकरची प्रसिद्धी तो निवृत्त होऊन देखील कमी झालेली नाही. तो आपल्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने देशाकडून खेळताना अनेक विक्रम केले आहे. त्याचे क्रिकेटप्रती प्रेम सर्वश्रुत आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी तो एक प्रेरणास्रोत आहे. त्याने भारतीय क्रिकेटला भरभरून योगदान दिले आहे. त्याने ३३ वर्षांपूर्वी एक प्रथा सुरु केली होती. ज्याची चर्चा आणि ती प्रथा आज देखील आहे. त्याच्या हेल्मेटवर भारतीय तिरंगा आपल्याला दिसून यायचा. आता तोच तिरंगा भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवर दिसून येतो. ही प्रथा सचिन तेंडुलकरने सुरु केली होती.
मास्टर ब्लास्टर एकदा म्हणाला होता की, ‘तो कुणा बोर्डासाठी नाही तर भारतासाठी खेळत असतो. सचिन तेंडुलकरने ३३ वर्षांपूर्वी त्याच्या हेल्मेटवर तिरंगा लावून खेळला होता. तेव्हापासून तो निवृत्त होईलस्तोवर तो हेल्मेटला तिरंगा लावून खेळत असे. आत ती परंपरा बनली आहे. प्रत्येक भारतीय फलंदाज आता आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावत असतो.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १९९२ मध्ये त्याच्या हेल्मेटवर तिरंगा लावून खेळायला सुरुवात केली होती. जेव्हा त्याला याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा तो म्हणाला होता की.”मी कोणत्याही बोर्डासाठी नाही तर देशासाठी खेळतो. म्हणूनच मी माझ्या हेल्मेटवर तिरंगा घालून खेळेन.” सचिन तेंडुलकरने सुरू केलेली ही परंपरा अजून देखील सुरू आहे.
हेही वाचा : ‘धोनीने इलेव्हनमधून वगळले आणि मी निवृत्ती..’, वीरेंद्र सेहवागने केला खळबळजनक खुलासा
याशिवाय, १९९६ च्या विश्वचषकामध्ये सचिन तेंडुलकरने त्याच्या बॅटवर कोणत्याही कंपनीचे स्टिकर लावलेले नव्हते, त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने स्टिकरशिवाय बॅटने खेळून खूप धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला ही बॅट आवडली होती. त्यानंतर तो म्हणाला की कोणी मला कितीही पैसे दिले तरी आता मी या संपूर्ण विश्वचषकात याच बॅटने खेळणार आहे. सचिनने त्या विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या.
सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये विजय मल्ल्याच्या कंपनीची जाहिरात करण्यास नकार दिला होता. विजय मल्ल्याच्या कंपनीकडून त्याला ही जाहिरात करण्यासाठी २० कोटी रुपये देण्यात आले होते. परंतु, सचिनने यावर नकार देत म्हटले होते की, तो कधीच दारू आणि तंबाखूची जाहिरात करू शकणार नाही. तो पुढे म्हणाला होता की, तो कधी देखील चुकीचे उदाहरण समोर ठेवणारा नाही. माझ्या वडिलांनी मला हे शिकवले होते. यांनतर, जेव्हा सचिन तेंडुलकर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हा त्याने त्याच्या बॅटवर लावलेली पकड ही तिरंग्याच्या रंगाची असल्याची दिसून आली होती.
हेही वाचा : ‘कहीं आग लगे लग जावे..’, माजी टेनिसपटून सानिया मिर्झाला कुणाच्या आठवणीत झुरतेय? VIDEO VIRAL