फोटो सौजन्य - सोशल मीडिया
इंडियन प्रीमियर लीग २०२५ : आयपीएल २०२५ मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे, त्यामुळे संघामध्ये मोठ्या प्रमाणात उलटफेर होणार आहेत. मेगा ऑक्शनमध्ये संघाला कमी खेळाडूंना संघामध्ये रिटेन करता येणार आहे. आता भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर याची निवड कारण्यात आली आहे. त्यामुळे आता कोलकता नाईट रायडर्सच्या प्रशिक्षण पदाची जागा अजुनपर्यत रिकामी आहे. आयपीएल २०२५ पूर्वी, केवळ खेळाडूंच्या बाबतीतच नव्हे तर कोचिंग स्टाफच्या रूपातही मोठे बदल दिसून येतील. ज्याप्रमाणे खेळाडू मेगा लिलावापूर्वी एका संघातून दुस-या संघात जाऊ शकतात, त्याचप्रमाणे कोचिंग स्टाफचे सदस्य देखील एका संघातून दुसऱ्या संघात जाऊ शकतात.
हेदेखील वाचा – ऋषभ पंतने सांगितले टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतमच्या गंभीर वागण्याचे रहस्य; ऐका ड्रेसिंग रूममधील किस्से
आता कोलकाता नाईट राइडर्सच्या प्रशिक्षणपदी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. आता बातमी समोर आली आहे की राजस्थान रॉयल्सचा संघ संचालक कुमार संगकारा कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR) गौतम गंभीरची जागा घेऊ शकतो. स्पोर्ट्स टुडेच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, संगकारा कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर बनण्याची चर्चा सुरू आहे. संगकारा केकेआरचा मेंटर झाला तर तो गौतम गंभीरची जागा घेईल. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीरला केकेआर सोडावे लागले. २०२४ मध्ये गंभीरकडे कोलकाताचा मेंटॉर म्हणून पाहिले जात होते. आता २०२५ मध्ये कुमार संगाकर केकेआरचा मेंटर म्हणून दिसू शकतो.
सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, श्रीलंकेचा माजी फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक कुमार संगकाराला राजस्थान रॉयल्सपासून वेगळे व्हायचे आहे आणि इतर संघांच्या ऑफरकडे लक्ष घालायचं आहे. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता असा बदल प्रत्यक्षात होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.