भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सध्या तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका सुरु आहे. आज या मालिकेतील दुसरा सामना रांची येथील स्टेडियमवर खेळवला जाणार असून हा सामना म्हणजे भारतासमोरील अस्तित्वाची लढाई आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला ९ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. मालिकेतील पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने १-० ची आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून भारताला १-१ अशी बरोबरी करण्याची संधी असणार आहे.
आज ९ ऑक्टोबर रोजी रांची येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका येथे खेळवला जाणारा दुसरा एकदिवसीय सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिझनी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.
भारतीय संघ :
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.