ऋषभ पंत आणि रवी शास्त्री(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील ३ कसोटी सामने खेळून झाले आहेत. या सामन्यात इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाकडून या सामन्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. भारतीय संघाला मालिकेत आपली स्पर्धा टिकून ठेवण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. अलीकडेच लॉर्ड्सवरील दारुण पराभव झाल्यांनतर शुभमन गिलसेना मँचेस्टर कसोटी जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मँचेस्टर कसोटीपूर्वी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक विधान केले आहे.
माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की पंतने या सामन्यापूर्वी सामन्यासाठी विकेटकीपरची जबाबदारी स्वीकारण्यास राजी होईपर्यंत मँचेस्टर कसोटीत फलंदाज म्हणून मैदानात उतरू नये.
शुक्रवारी, आयसीसीलकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रवी शास्त्री यांनी ऋषभ पंतबद्दल चर्चा केली आहे. ते म्हणाले की, “मला वाटत नाही की जर पंत विकेटकीपिंग करू शकत नसेल, तर त्याने स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून मैदानात उतरावे, कारण त्याला क्षेत्ररक्षण करावे लागेल.”
माजी अनुभवी खेळाडू पुढे म्हणले की, “जर तो क्षेत्ररक्षण करत असेल तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. कारण हातमोजे घालून किमान काही संरक्षण उपलब्ध आहे. हातमोजेशिवाय, जर त्याला टोचणारी एखादी गोष्ट लागली तर ते फार चांगले असणार नाही. यामुळे दुखापत आणखी वाढेल.”
हेही वाचा : IND Vs ENG : ड्यूक बॉलवरील टीका जिव्हारी! कंपनीने उचललं मोठं पाऊल; वाचा सविस्तर
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीदरम्यान ऋषभ पंतने पहिल्या डावात ७४ धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत त्याला मैदानाबाहेर जावे लागेल होते. त्यानंतर तो संपूर्ण सामन्यात विकेटकीपिंग करू शकला नव्हता. त्याच्या जागी ध्रुव जुरेलने विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारली होती. अशा परिस्थितीत, त्याच्या चौथ्या कसोटीमध्ये खेळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. तथापि, टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन डोश यांनी आशा व्यक्त केली आहे की तो चौथ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्त होणार आहे.