फोटो सौजन्य : X
भारताच्या संघाने 2024 चा विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेट चाहत्याचा दुष्काळ संपवला. भारताच्या संघाने मागील काही वर्षामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. त्याचा परिणाम देखील जगाला पाहायला मिळाला आहे. भारताच्या संघाने 2024 मध्ये विश्वचषक जिंकला आणि उत्साह संपुर्ण देशाने साजरा केला. 2025 मध्ये भारताच्या संघाने दुबईमध्ये चॅम्पियन ट्राॅफी जिंकली आणि भारताला आणखी एक आनंद साजरा करण्याची संधी दिली. आता भारतीय विश्वचषक 2024 च्या संघामध्ये सामील झालेल्या खेळाडूची आकडेवारी समोर आली आहे.
भारताच्या संघामधील शिवम दुबे हा त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे देखील ओळखला जातो. त्याने भारतासाठी मोठी खेळी फार कमी खेळल्या असतील पण तो भारतासाठी कठीण काळामध्ये महत्वाच्या धावा करण्यासाठी ओळखला जातो. पण आता शिवम दुबे याने त्याच्या नावावर आणखी एक पराक्रम केला आहे आणि ते पाहुन तुम्हाही धक्का बसेल याचे कारण काय यासंदर्भात सविस्तर सांगणार आहोत.
IPL 2025 चे जेतेपद होणार RCB च्या नावावर? माजी क्रिकेट खेळाडूची भविष्यवाणी, क्रिकेट विश्वात खळबळ
शिवम दुबे हा आता जगामध्ये 30 सामने खेळुन एकही सामना न गमावलेला खेळाडू ठरला आहे. शिवम दुबे हा भारतीय टी-20 संघासाठी खेळतो त्याला मागील बऱ्यालाही धक्का बसेल. शिवम दुबेला भारतीय संघाचा लकी चार्म म्हटले जात आहे भारतीय संघामध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारतीय संघामध्ये स्ठान मिळाले आहे. डिसेंबर 2019 पासुन भारतीय संघासाठी तो अष्टपैलुची भुमिका साकारत आहे. त्याने आतापर्यत 30 सामने खेळले आहेत. 30 सामन्यामध्ये त्याचा एकही सामन्यात पराभव झाला नाही.
सलग 30 सामन्यामध्ये विजय मिळवणार तो आता जगातला पहिला क्रिकेट खेळाडू ठरला आहे. शिवम दुबेच्या t20 आकडेवारी बद्दल सांगायचे झाले तर त्याने आत्तापर्यंत 35 सामने खेळले आहेत यामध्ये त्याने 531 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. T20 बॉलिंग करिअरमध्ये त्याने 35 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतले आहेत.
शिवम दुबे आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता पण चेन्नई सुपर किंग्स संघाने या सिझनमध्ये काही विशेष कामगिरी केली नाही संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे त्याचबरोबर यावेळी पहिल्यांदा आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचा संघ दहाव्या क्रमांकावर राहिला.