फोटो सौजन्य : Royal Challengers Bengaluru
Dale Steyn prediction : राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाब किंग्सच्या संघाला पराभूत करुन फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. बंगळुरुच्या संघाने पंजाबच्या संघाला 101 धावांवर सर्वबाद करुन संघाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभुत करुन फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. या सिझनमध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने कमालिची कामगिरी केली आहे. आता ते फक्त 1 सामना विजय दुर आहेत. सोशल मिडीयावर आयपीएल 2025 चा विजेता कोण होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. आता एक दिग्गज माजी क्रिकेट खेळाडूने मोठी भविष्यवाणी केली आहे, त्यामुळे क्रिकेट विश्वामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आयपीएल २०२५ बाबत एक मोठी आणि धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्याने त्याच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले आहे की “तुम्हाला विश्वास बसेल का? आरसीबीने आयपीएल जिंकले आहे.” त्याच्या भाकितानंतर, आरसीबीचे चाहते खूप आनंदी आहेत कारण आजपर्यंत आरसीबीने एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. तथापि, काही लोकांनी कबूल केले आहे की स्टेनचे भाकित मागील काही प्रसंगी चुकीचे ठरले आहेत.
खरंतर, आरसीबीने या हंगामात उत्तम पुनरागमन केले आहे आणि लीग स्टेज दुसऱ्या स्थानावर संपवला आहे. संघाने १४ पैकी ९ सामने जिंकले आणि ९ वर्षांनी टॉप-२ मध्ये स्थान मिळवले. आरसीबी अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज डेल स्टेनने एक मोठी भविष्यवाणी केली.
त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट ‘एक्स’वर लिहिले, “तुम्हाला विश्वास बसतो का? आरसीबीने आयपीएल जिंकले आहे!” स्टेनचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा आरसीबीने क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आरसीबीचे चाहते त्यांच्या संघाच्या पहिल्या आयपीएल जेतेपदाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते आणि स्टेनच्या या भाकितामुळे त्यांच्या आशा आणखी वाढल्या आहेत.
Can you believe it?!?!?!
RCB have won the IPL— Dale Steyn (@DaleSteyn62) May 30, 2025
आता डॅन स्टेनची ही भविष्यवाणी खरी ठरते की यावेळीही आरसीबीला पहिले आयपीएल जेतेपद हुकते हे पाहणे मनोरंजक ठरेल. बरं, फक्त अंतिम सामनाच सांगेल. याआधी डेल स्टेनने अनेक भाकिते केली होती. गेल्या वेळी त्याने सनरायझर्स हैदराबादबद्दल असा दावा केला होता की ते आयपीएलमध्ये ३०० धावा करतील, पण ते चुकीचे ठरले. आता आरसीबी चाहते फक्त अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत जेव्हा त्यांचा संघ ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल.