Shubhman Gill : शुभमन गिल ICC Player of the Month चा मानकरी; स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन फिलिप्स यांना टाकले मागे..(फोटो; सोशल मीडिया)
Shubhman Gill : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि तब्बल 12 वर्षाचे तप संपले. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयानंतर भारतीय खेळाडूंचे नशीब फळफळत आहे. आयआयसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी चांगले नंबर मिळवले आहेत. तसेच आता पुन्हा एकदा आयसीसीकडून एक गोड बातमी समोर आली आहे . भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिलची फेब्रुवारी महिन्यासाठी आयसीसीकडून सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. गिलने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या घरच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सला मागे टाकत या पुरस्कारावर नाव कोरले.
शुभमन गिलने फेब्रुवारीमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये 101.50 च्या सरासरीसह 94.19 च्या स्ट्राइक रेटने 406 धावा केल्या आहेत. त्याने दोन अर्धशतके आणि एक शतक लगावत इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला 3-0 ने विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
नागपुरात खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गिलने 87 धावा, कटकमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 60 धावा आणि त्यानंतर अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 112 धावा करत खेळण्यात सातत्य राखले होते. अहमदाबादमधील सामन्यात तो सामनावीर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही देखील गिलने आपल्या खेळाची ली कायम राखली होती. दुबईत भारताच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 101 धावा केल्यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध 46 धावा केल्या होत्या. हे दोन्ही सामने भारताने सहज जिंकले होते. गिलचा हा तिसरा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे. त्याने यापूर्वी 2023 मध्ये दोनदा म्हणजे जानेवारी आणि सप्टेंबर महिन्यासाठी हा पुरस्कार जिंकला होता.
हेही वाचा : Virat kohli : विराटची विकेट जाताच तरुणीने घेतला अखेरचा श्वास; वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर…
शुभमन गिलने सांगितले की, ‘फेब्रुवारीसाठी आयसीसी पुरूष खेळाडूचा मंथ पुरस्कार जिंकून मला खूप आनंद झाला आहे. मला माझ्या देशासाठी बॅटने कामगिरी करणे आणि सामने जिंकणे यापेक्षा व्यतिरिक्त आणखी कशानेही प्रेरणा मिळत नाही. असेही गिलने म्हटले आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव केला आहे. भारताने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावे केली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. तर न्यूझीलंडला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.