फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
उस्मान ख्वाजाचे द्विशतक : सध्या श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन सामान्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आज या मालिकेच्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी कांगारूंच्या फलंदाजानी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा घाम गाळला आहे. आता १३७ ओव्हरचा खेळ झाला आहे, यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ५ विकेट्स गमावून ५७९ धावा केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजाने कहर केला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अर्थात बीजीटीच्या पाच डावांत एकूण १८४ धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजाच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम लागल्याची चर्चा होती, पण श्रीलंकेला जाताच त्याने इतिहास रचला. बीजीटीमध्ये १० डावात २०० धावाही न करणाऱ्या ख्वाजाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले. श्रीलंकेत कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे . कसोटी क्रिकेटमध्येही त्याने आपली बुडणारी बोट किनाऱ्यावर आणली आहे.
Champions Trophy 2025 : पाकिस्तान पुन्हा अडचणीत, स्पर्धेसाठी स्टेडियम वेळेवर तयार करणे ‘अशक्य’
उस्मान ख्वाजाने २९० चेंडूंमध्ये १६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने आपले द्विशतक पूर्ण केले, जे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिले द्विशतक आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडसह सलामी करणारा उस्मान ख्वाजा दुसऱ्या दिवशीही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. बीजीटीमधील पहिल्या तीन सामन्यांमध्ये उस्मान ख्वाजा सपशेल अपयशी ठरला होता. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने काही धावा केल्या असल्या तरी संपूर्ण मालिकेत त्याला २०० धावाही करता आल्या नाहीत. त्याने ५ सामन्यांच्या १० डावात एकूण १८४ धावा केल्या. त्याची सरासरी २०.४४ होती.
A statement knock!
Usman Khawaja brings up a magnificent double hundred 👏 #WTC25 | 📝 #SLvAUS: https://t.co/8NKpfnNf96 pic.twitter.com/xx40MCXu2u
— ICC (@ICC) January 30, 2025
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर उस्मान ख्वाजाने २३२ धावांची खेळी पहिल्या इनिंगमध्ये खेळली, तर ट्रेव्हिस हेडने ५७ धावांची खेळी खेळली. मार्नस लॅबुशेन याने संघासाठी फक्त २० धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने पुन्हा एकदा संघासाठी चमत्कार केला आणि १४१ धावांची खेळी खेळली तो महान खेळाडू आहे हे सिद्ध केलं. सध्या मैदानावर अलेक्स कॅरी आणि ब्यू वेबस्टर हे मैदानावर अजून टिकून आहेत.
२०१६ मध्ये डाव्या हाताचा फलंदाज उस्मान ख्वाजा एकाच दिवशी दोनदा गालेमध्ये बाद झाला होता. अशा स्थितीत उस्मान ख्वाजा फिरकी खेळू शकत नाही असे म्हटले जात होते, परंतु आता तो २०२५ मध्ये फिरकीवर वर्चस्व गाजवत आहे आणि श्रीलंकेत कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. या मालिकेपूर्वी त्याने निवृत्तीबाबतही वक्तव्य केले होते आणि ऑस्ट्रेलियन संघाला आपली गरज नाही असे वाटत असेल तर तो कसोटी क्रिकेट सोडेन असे म्हटले होते. आता द्विशतक झळकावून त्याने सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.