फोटो सौजन्य – X
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्यात लावली सापाने हजेरी : श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये कालपासुन म्हणजेच 2 जुलैपासुन सामन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिल्या बांग्लादेशच्या संघाला श्रीलंकेच्या संघाने पराभुत करुन एकदिवसीय मालिकेमधील पहिल्या सामन्यात विजय नोंदवुन मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांग्लादेशचे कर्णधारपद हे मेहंदी हसन मिराजकडे सोपवण्यात आले आहे, तर श्रीलंकेची कमान ही चरिश असंलका यांच्याकडे आहे. आता सोशल मिडीयावर या सामन्यादरम्यानचा एक फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सामन्यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे सामना मध्येच थांबवावा लागला आणि काही काळ मैदानावर गोंधळ उडाला. सामना थांबवण्याचे कारणही समोर आले आहे. सामन्यादरम्यान, बांगलादेश फलंदाजी करत असताना, डावाच्या तिसऱ्या षटकात एक साप मैदानात घुसला. साप आत शिरल्याने मैदानात गोंधळ उडाला. मैदानावर साप पाहून खेळाडूही घाबरले, ज्यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला. तथापि, काही वेळाने साप मैदानाबाहेर गेला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला.
IND vs ENG : 310 धावा, 5 विकेट्स… 1 शतक! पहिल्या दिनी भारतीय फलंदाजांचा बोलबाला; वाचा सविस्तर
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २४४ धावा केल्या. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कर्णधार चारिथ असलंकाने शानदार शतकी खेळी केली. फलंदाजी करताना असलंकाने १२३ चेंडूत १०६ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. याशिवाय कुशल मेंडिसने ४५ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना तस्किन अहमदने सर्वाधिक ४ बळी घेतले. तंजीम हसन साकिबने ३ बळी घेतले.
Snake in the stadium! 🐍
A Sri Lanka-Bangladesh game it is! OF COURSE a snake pays a visit 😂
A TRIBUTE to the rivalry! 🫡#SLvBAN pic.twitter.com/H3w6IXiBLE
— Cricketangon (@cricketangon) July 2, 2025
यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ३५.५ षटकांतच सर्वबाद झाला. बांगलादेशकडून फलंदाजी करताना तन्जीद हसनने सर्वाधिक ६२ धावा केल्या. ज्यामध्ये ९ चौकार आणि १ षटकार होता. याशिवाय झाकीर अलीने ५१ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ४ षटकार आले. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना वानिंदू हसरंगाने ७.५ षटकांत फक्त १० धावा देत ४ बळी घेतले. याशिवाय कामिंदू मेंडिसने ५ षटकांत १९ धावा देत ३ बळी घेतले.