स्पेनने जिंकला फिफा वर्ल्डकप 2026 (फोटो- ians)
काल फिफाचा अंतिम सामना पार पडला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे चुरशीचा असा सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. अर्जेंटिनाचा एंजो फर्नांडिस याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ 11 ऐवजी 10 खेळाडूंसह खेळत होता. अखेर 90 मिनिटानंतर दिलेल्या अतिरिक्त वेळेत स्पेनने विजय प्राप्त केला आहे.
स्पेनने फिफाचा वर्ल्डकप जिंकला आहे. फिफा स्पेनच्या संघाला मोठे बक्षीस दिले आहे. स्पेनने जिंकल्यावर फिफाने 50 मिलियन डॉलरचे बक्षीस दिले आहे. याची किंमत भारतीय आकडेवारीनुसार 480 कोटी रुपये इतकी होते. 2022 मध्ये फिफाने 42 मिलियन डॉलर्स बक्षिस दिले होते. यावर्षी 8 मिलियन डॉलर्सने रक्कम वाढवण्यात आली आहे. उपविजेता राहिलेल्या अर्जेंटीनासंघाला देखील 33 मिलियन डॉलर्स म्हणजे (३१८ कोटी रुपयांचे) बक्षिस दिले आहे.
FIFA World Cup 2026 Final: लामिन यमालचा धमाका! World Record करत रचला इतिहास, मेस्सीचं स्वप्नं भंगलं
फिफा वर्ल्डकपमध्ये फ्रांसचा पराभव करत तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या इंग्लंडच्या संघाला 29 मिलियन डॉलर्स म्हणजेच (279 कोटी रुपये) तर चौथ्या स्थानवरील फ्रांसला (260 कोटी रुपये) देण्यात आले आहेत. क्वार्टर फायनलपर्यन्त जाणाऱ्या प्रत्येक संघाला (183 कोटी रुपये) मिळणार आहेत. राऊंड ऑफ 16 मध्ये स्पर्धेबाहेर जाणाऱ्या संघांना (144 कोटी) देण्यात आले आहेत.
स्पेनने फिफा वर्ल्डकपमध्ये शानदार खेळ केला. निर्धारित 90 मिनिटांमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला तेव्हा स्पेनच्या फेरान टोरेसने 106 व्या मिनिटाला एकमेव गोल करत स्पेनला दुसऱ्यांदा विश्वविजेता बनवले. तब्बल 16 वर्षांनी स्पेनने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले आहे.
गोल्डन बूटची शर्यत रंगली! एम्बाप्पेचा FIFA विश्वचषकात जलवा; मेस्सीला मागे टाकत मोडला ‘हा’ विक्रम
मेस्सीचं स्वप्नं भंगलं
स्पेनने अर्जेंटिनाविरुद्ध अंतिम सामन्यात १-० ने विजय मिळवून फिफा विश्वचषक २०२६ जिंकला. बदली खेळाडू फेरान टोरेस स्पेनच्या विजयाचा नायक ठरला, त्याने अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करून २०१० नंतरचे दुसरे विजेतेपद निश्चित केले. या विजयात लॅमिन यामालने गोल केला नसला तरी, त्याने एक असा विक्रम प्रस्थापित केला जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. वयाच्या १९ व्या वर्षी युरो कप आणि फिफा विश्वचषक या दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये खेळणारा यामाल आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासातील एकमेव खेळाडू ठरला.






