फोटो सौजन्य - IndianPremierLeague
SRH vs DC match cancelled : आयपीएल २०२५ च्या ५५ व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स हैदराबादशी लढत झाली ही लढत फक्त काही वेळासाठी झाली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आजच्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि यामध्ये त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ७ विकेट्स गमावल्यानंतर धावफलकावर १३३ धावा केल्या आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या पाच फलंदाजांची एकही चालली नाही आणि पहिले चार फलंदाज एकेरी अंकामध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले.
तथापि, दुसरा डाव पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हैदराबादमध्ये इंद्र देवचा मूड खराब झाला आहे आणि राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आजच्या सामन्यांमध्ये हैदराबाद संघाच्या जिंकण्याच्या आशा जास्त होत्या पण संघ विजयापर्यत जाऊ शकला नाही आणि पावसाने हजेरी लावली. अशा परिस्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर त्याचा फायदा कोणाला होईल? जर पाऊस खलनायक ठरला तर प्लेऑफमध्ये कोणाचा मार्ग कठीण होईल हे आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगू.
Match 55. Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals – No Result https://t.co/1MkIwk4VNE #SRHvDC #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2025
जर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला तर पॅट कमिन्सची सेना प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडेल. हैदराबादसोबत दिल्लीलाही नुकसान सहन करावे लागू शकते. पावसामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत, ११ सामन्यांनंतर दिल्लीचे एकूण १३ गुण होतील. यानंतर, दिल्लीला उर्वरित ३ सामन्यांपैकी किमान २ सामन्यांमध्ये विजयाची चव चाखावी लागेल. दोन सामने जिंकल्याने दिल्लीचे एकूण गुण १७ होतील आणि संघाला प्लेऑफचे तिकीट मिळेल.
SRH vs DC : सनरायझर्स हैदराबादच्या कामगिरीवर पावसानं फेरलं पाणी! राजीव गांधी मैदानावर मुसळधार पाऊस
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली. करुण नायर पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, फाफ डु प्लेसिस देखील फक्त ३ धावा करून बाद झाला. अभिषेक पोरेल ८ धावा काढून कमिन्सने बाद झाला. केएल राहुलला जयदेव उनाडकटने फक्त १० धावांवर बाद केले. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली, ज्यामुळे दिल्लीने २० षटकांत ७ गडी गमावून १३३ धावा केल्या. आशुतोष आणि स्टब्स यांनी ४१-४१ धावा केल्या.