मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी लॉंच (फोटो- टीम नवराष्ट्र/ ट्विटर)
Mumbai Indians have unveiled their Brand New Jersey for the Upcoming Tata IPL Season 2025 :मार्च महिन्यापासून इंडियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे. IPL च्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध झाले. २२ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर गतविजेत्या KKR आणि RCB यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाणार आहे. तर २३ मार्च रोजी,कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने येणार आहेत. दरम्यान स्पर्धा सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी लॉंच झाली आहे. त्याचे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सने आपली नवीन जर्सी लॉंच केली आहे. त्याचा व्हिडिओ देखील मुंबई इंडियन्सने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या नवीन जर्सीमध्ये मुंबई इंडियन्सची ओळख दर्शवणारे रंग तसेच ठेवण्यात आले आहेत. दरम्यान सोशल मिडियामध्ये शेअर झालेल्या या व्हिडिओमधून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या चाहत्यांना एक संदेश देखील दिला आहे.
👕 𝗧𝗛𝗜𝗦 𝗜𝗦 𝗔 𝗣𝗥𝗢𝗠𝗜𝗦𝗘 𝗧𝗢 𝗬𝗢𝗨 📝
आपल्या मुंबईची jersey for the 𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟓 𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 💙 👉 https://t.co/FgRK3BUE6a#MumbaiIndians pic.twitter.com/cYbhV5V5L6
— Mumbai Indians (@mipaltan) February 21, 2025
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यान एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात हार्दिक पंड्या म्हणाला, ‘प्रिय पलटण. 2025 हे वर्ष आपल्या टीमचा वारसा ज्या ठिकाणी असायला हवा, त्या ठिकाणी तो नेण्याची एक संधी आहे. निळा आणि सोनेरी रंगाचा पोशाख परिधान करून मुंबईप्रमाणे खेळण्यासाठी मैदानात उतरू. ही केवळ आमची जर्सी नाही तर आमचे एक वचन देखील आहे. चला भेटूयात वानखेडे स्टेडियमवर.’
🫵 • 👕 • 💙
Visit the MI Shop and get your jersey 𝙉𝙊𝙒 👉 https://t.co/aUFV1sbjeB#MumbaiIndians pic.twitter.com/yuTAIo02kg
— Mumbai Indians (@mipaltan) February 21, 2025
मुंबई इंडियन्सच्या नवीन जर्सीबद्दल बोलायचे झाल्यास ती जर्सी आकर्षक दिसत आहे. नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सचा संघ निळ्या आणि सोनेरी रंगाच्या जर्सीमध्ये दिसून येत आहे. जर्सीच्या उजव्या बाजूला स्पॉन्सरचा लोगो दिसून येत आहे. तर डाव्या बाजूस मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा लोगो दिसून येत आहे. या नवीन जर्सीमध्ये मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूनी फोटोशूट केले आहे.
हार्दिकवर एका सामन्याची बंदी
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या खेळू शकणार नाही. गेल्या हंगामात, स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती आणि ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. BCCI ने गेल्या वर्षी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की, हा त्यांच्या संघाचा या हंगामातील तिसरा ओव्हर-रेट गुन्हा होता, त्यामुळे पंड्याला दंड ठोठावण्यात आला.
हार्दिकऐवजी फक्त रोहितच का?
हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत संघ माजी कर्णधार रोहित शर्माकडे जबाबदारी सोपवू शकतो. रोहितच्या नेतृत्वाखाली, MI ने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये पाच IPL जेतेपद जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सने IPL च्या अंतिम सामन्यात CSKला तीनदा हरवले आहे आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्यांचा २०-१७ असा प्रभावी विक्रम आहे.