आयपीएल 2026 मध्ये टॉप 2 मध्ये कोणाला संधी मिळणार? (फोटो- सोशल मिडिया)
आयपीएल 2026 मध्ये तीन संघ झाले क्वालिफाय
पहिल्या दोन स्थानासाठी तीन संघ शर्यतीत
चौथ्या स्थानासाठी 5 संघांमध्ये चुरस
Tata IPL Play Off 2026: आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. 26 मे पासून प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. यंदाच्या हंगामात आरसीबी, एसआरएच आणि गुजरात टायटन्स या संघांनी क्वालिफाय केले आहे. मात्र चौथा संघ कोण असणार याची उत्सुकता लागली आहे. त्यासाठी अनेक संघ मैदानात उतरले आहेत. आज आपण पहिल्या दोन स्थानावर कोणता संघ असू शकतो याबाबत जाणून घेउयात.
आयपीएलमध्ये आतापर्यंत 63 सामने खेळले गेले आहेत. पुढील आठवड्यात प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. मात्र अद्याप टॉप 4 मधला शेवटचा संघ क्वालिफाय होणे बाकी आहे. 31 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. टॉप 3 मध्ये असणाऱ्या संघांमध्ये टॉप 2 साठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणते दोन संघ असणार हे काही दिवसांनी समजण्यास मदत होणार आहे.
गुजरात टायटन्स आणि एसआरएचने 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघांचा अद्याप एक सामना बाकी आहे. गुजरातचा रनरेट एसआरपेक्षा जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुजरात दुसऱ्या तर एसआरएच तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आरसीबी, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांना टॉप 2 मध्ये जाण्याची संधी आहे. एसआरएचचा रनरेट कमी असला तरी त्यांना देखील संधी मिळू शकते.
IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ
आरसीबीचा शेवटचा सामना हा एसआरएच विरुद्ध होणार आहे. त्यामुळे टॉप 2 मध्ये जागा हवी असल्यास दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. आरसीबी जिंकल्यास त्यांचे 20 पॉईंट्स होणार आहेत. तसे झाल्यास आरसीबी टॉप 2 मध्ये नक्की जाऊ शकते. मात्र एसआरएच जिंकल्यास दोघांचे समान पॉईंट्स होतील. मग रनरेटनुसार कोणता संघ पुढे जाणार हे ठरवले जाईल.
SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ
यंदाच्या हंगामात आरसीबीने सर्वात पहिल्यांदा क्वालिफाय केले आहे. आरसीबीचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यांच्या ट्रॉफी जिंकण्याची आशा वाढली आहे. काल एसआरएच विरुद्ध चेन्नईचा दारुण पराभव केला आहे. या विजयामुळे केवळ हैदराबादने आपले प्लेऑफचे तिकीट पक्के केले नाही, तर पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ केली आहे.
संकटे आली दारात! IPL 2026 मध्ये MI ला प्रचंड मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार जखमी अन्…
हैदराबादने चेन्नईला धूळ चारली. याचा फायदा गुजरात टायटन्सचा फायदा झाला आहे. हैदराबादच्या या विजयामुळे गुजरातचा अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला. दुसरीकडे चेन्नईच्या संघाचा अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.






