Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! ३ आठवड्यांतच कोसळणार बालेन सरकार? गृहमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांच्या भ्रष्टाचाराचा आणि उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आले आहे. काही वादग्रस्त व्यावसायिकांच्या कंपन्यांकडून स्वीट शेअर्स खरेदी केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुदन यांनी अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. मात्र आता ते स्वत:च चौकशीच्या घेरात अडकले आहेत.
सुदन यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान बालेन शाह (Balen Shah) यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा देताना त्यांनी स्पष्ट केले आहे की, माझ्यासाठी पदापेक्षा नैतिकता आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे. सध्या नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या तरुणांकडून सुशासन आणि पारदर्शकतेसाठी आंदोलने सुरु आहे. याचा आदर राखण्यासाठी आणि तपासात कोणताही अडथला येऊ नये यासाठी आपण रानीमा देत असल्याचे सुदन यांनी म्हटले आहे.
बालेन शाह सरकार सत्ते येऊन महिनाही पूर्ण झालेला नाही. मात्र नव्या सरकारच्या निर्णयामुळे जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. गृहमंत्री सुदन गुरंग यांचा राजीनामा, भारत-नेपाळ सीमेवरील व्यापारी धोरणे यांमुळे जनता रस्त्यावर उतरली आहे.
भारताकडून येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर सीमा शुल्क लावल्याने नेपाळमध्ये महागाई वाढली आहे. यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच यामुळे भारत-नेपाळ संबंध (India Nepal Relations) ही ताणले जाण्याची शक्यता आहे.
सध्या सुदन गुरुंग यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावरील आरोपांची तपासणी केली जाणार आहे. यावर पंतप्रधान बालेन शाह काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका बाजूला राजकीय अस्थिरता आणि दुसऱ्या बाजूला जनतेचा असंतोषामुळे मोठा पेच निर्माण झाली आहे.
Ans: गृहमंत्री सुदन गुरुंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याचा, व्यावसायिकांच्या कंपन्यांकडून स्वीट शेअर्स खरेदी केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान पदावर राहणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी आपले पद सोडले आहे.
Ans: सध्या नव्या सरकारसमोर दुहेरी संकट आहे. सत्तेत येऊन ३ आठवडे झाले असतानाच गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोपांमुळे सरकारची प्रतिमा खराब झाली आहे. तसेच भारताकडून येणाऱ्या वस्तूंवर शुल्क लादल्याने जनतेत संतापाचे वातावरण आहे.






