गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज कागिसो रबाडा अडचणीत? (Photo Credit- X)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये रबाडासारखी दिसणारी एक व्यक्ती सिगरेट ओढताना दिसत आहे. हा व्हिडिओ गुजरात टायटन्सच्या टीम हॉटेलमधील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये रबाडासोबत इतरही काही व्यक्ती दिसत असून, त्या संघाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर सध्या संभ्रमावस्था कायम आहे.
Kagiso Rabada was spotted smoking at the GT team hotel. 👀 Rashid Khan and Gujarat Titans players and staff were also there, appearing to speak with him—it looked like Rashid was trying to stop him. Was the theory about Rabada true? pic.twitter.com/0VT79nGPUU — Sonu (@Cricket_live247) April 22, 2026
मैदानावर कागिसो रबाडाची कामगिरी यंदाच्या हंगामात अत्यंत प्रभावी राहिली आहे. तो सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 6 सामन्यांत 10 गडी बाद केले आहेत. 22.20 ची सरासरी आणि 9.73 च्या इकॉनॉमी रेटसह तो गुजरातच्या गोलंदाजीचा मुख्य आधार ठरला आहे. अशा परिस्थितीत समोर आलेल्या या वादग्रस्त व्हिडिओमुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
LSG Vs RR: शामी विरुद्ध Vaibhav Suryvanshi रंगणार सामना; पहा दोन्ही संघांची Playing 11
या नवीन व्हिडिओमुळे रबाडाच्या शिस्तभंगाच्या जुन्या प्रकरणांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. गेल्या आयपीएल हंगामात ‘साऊथ आफ्रिकन इन्स्टिट्यूट फॉर ड्रग फ्री स्पोर्ट्स’ने रबाडावर एका महिन्याची बंदी घातली होती. त्या काळात त्याने स्पर्धेतून तात्पुरती माघार घेतली होती. डोपिंग प्रकरणाची सविस्तर माहिती कधीही सार्वजनिक करण्यात आली नव्हती, ज्यामुळे त्यावेळीही अनेक तर्क-वितर्क लढवले गेले होते.
गुजरात टायटन्सचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. येत्या 24 एप्रिल रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी रबाडाबाबतचा हा वाद संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
आयपीएल 2026 च्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याचाही अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये चहल कथितरित्या धूम्रपान करत गाडी चालवताना दिसत होता. त्या प्रकरणाचीही पुष्टी झाली नव्हती, तरीही सोशल मीडियावर खेळाडूंच्या शिस्तीबाबत मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.
RR Vs LSG Pitch Report: कशी असणार एकानाची खेळपट्टी; टॉस जिंकून ‘हा’ निर्णय घेतल्यास…






