भारत आणि दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa) यांच्यात आज ९ ऑक्टोबर रोजी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. रांची येथील जेएससीए स्टेडियमवर (JSCA Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. मात्र या सामन्याचे तिकीट काढण्यासाठी आलेले चाहते तेथील केलेल्या व्यवस्थेमुळे भारतीय क्रिकेट बोर्डावर (BCCI) फार संतापले. एवढेच नाही तर याठिकाणी चाहत्यांकडून घोषणाबाजी करून निषेध देखील व्यक्त करण्यात आला.
क्रिकेट चाहत्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयच्या घरच्या मालिकेदरम्यान केलेल्या गैरकारभारावर निशाणा साधला आहे. चाहत्यांनी जेएससीए आणि बीसीसीआयवर टीका केली आहे. रांचीमधील मालिकेच्या दुसऱ्या वनडेसाठी तिकीट मिळविण्याच्या त्रासदायक प्रक्रियेबद्दल तक्रार केली आहे. काहींनी आपली फसवणूक झाल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
रांचीमधील चाहते तिकीट वाटपाच्या प्रक्रियेवर नाराज झाले. हैदराबादमध्येही तेच पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांना तेथे हस्तक्षेप करावा लागला. काही चाहते जखमी झाल्याचेही वृत्त आहे. रांची वनडेसाठी तिकीट खरेदी प्रक्रियेबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या आधी चाहते तिकीट खरेदीसाठी लांब रांगेत उभे असलेले दिसले. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेत टीम इंडियाला नऊ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
This is the Q to collect physical ticket (which is online Purchased already) of Ind Vs SA 2nd ODI Cricket match at JSCA Stadium, Ranchi. If ticket is purchased online then why people should have to stand in Q whole day? #BCCI #JSCA pic.twitter.com/dnYvAdUO8k
— Aakash Datrange (@Aakashree) October 8, 2022