नवी दिल्ली – विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने T२० विश्वचषकात दमदार पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवीर पथुम निशांकाने ४० आणि चरित असलंकाने नाबाद ३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पाच गोलंदाजांनी १-१ बळी घेतले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १६.३ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. मार्कस स्टॉइनिसने या सामन्यात धमाकेदार फलंदाजी करत १८ चेंडूत ५९ धावा केल्या.
यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट ३२७.७७ होता. त्याने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजीतील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याचवेळी कर्णधार अॅरॉन फिंचच्या बॅटने ४२ चेंडूत ३१ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लेगस्पिनर एडम झाम्पा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. श्रीलंकेने या स्पर्धेत सलग तीन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला होता.