फोटो सौजन्य - सोशल मिडिया
टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरूवात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार आहे, परंतु स्पर्धेपूर्वी भारत आणि बांगलादेशमधील क्रिकेट संघर्ष सातत्याने वाढत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी स्पष्ट केले आहे की, बोर्डाने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या ठिकाणात बदल करण्याची मागणी करण्यासाठी आयसीसीला पत्र लिहिले आहे आणि आता पुढील चरणासाठी आयसीसीच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.
४ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्रात, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) स्पष्टपणे म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत संघाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता आहेत. म्हणूनच बांगलादेशने भारतात प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरने आयपीएल २०२६ च्या आधी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला रिलीज केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमांशी बोलताना अमिनुल इस्लाम म्हणाले की, हा निर्णय घाईघाईने घेण्यात आला नव्हता. पुढे ते म्हणाले की, या मुद्द्यावर आम्ही सर्व संचालक मंडळासोबत दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. सध्याच्या परिस्थितीत आमचा संघ भारतात पाठवणे आम्हाला सुरक्षित वाटत नाही. सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे बीसीबी अध्यक्षांनी सांगितले आहे.
SMAT-2025 खेळणारी क्रिकेटपटू डोप टेस्टमध्ये अपयशी, महिला खेळाडूवर डोपिंगमुळे 8 वर्षांची बंदी
बीसीबी अध्यक्षांनी असेही स्पष्ट केले की बोर्डाने सुरुवातीला आयसीसीकडे तीन महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची योजना आखली होती, परंतु शेवटी फक्त एकाच औपचारिक मागणीवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला. इस्लाम म्हणाले, आम्ही आयसीसीला ईमेल पाठवला आहे आणि आशा आहे की ते लवकरच आमच्याशी भेटतील, जिथे आम्ही आमच्या चिंतांबद्दल सविस्तरपणे सांगू. अमिनुल इस्लाम यांनी असेही स्पष्ट केले की या प्रकरणाबाबत बीसीसीआयशी कोणतीही चर्चा झालेली नाही. ही एक आयसीसी स्पर्धा आहे, म्हणून आमच्या सर्व चर्चा आयसीसीशी होत आहेत. आम्ही पुढे काय करायचे ते आयसीसीच्या प्रतिसादावर अवलंबून असेल असे बीसीबी अध्यक्षांनी सांगितले आहे.
या संपूर्ण प्रकरणादरम्यान, बांगलादेशने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) चे देशात प्रसारण बंदी घालणे. याचा अर्थ बांगलादेशी चाहते आयपीएल 2026 चे सामने पाहू शकणार नाहीत. सर्वांचे लक्ष आता आयसीसीच्या निर्णयावर आहे, जो 2026 च्या टी20 विश्वचषकाबाबत बांगलादेशची पुढील पावले निश्चित करेल.






