विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli sets a record in List A cricket: मोठ्या विश्रांतीनंतर विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये परतला आहे. या स्टार भारतीय खेळाडूने आता खास टप्पा गाठला आहे. २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा आंध्र विरुद्धचा पहिला सामना खेळत असलेल्या विराट कोहलीने मैदानावर उतरताच इतिहास घडवला आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१ वर फलंदाजीसाठी येत असताना, त्याने चौकार मारून लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० धावा पूर्ण केल्या आहेत.
हेही वाचा : ICC T20 rankings : आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताची दीप्ती चमकली! पहिल्यांदाच झाली अव्वलस्थानी विराजमान
दिल्लीचा पहिला बळी संघाच्या एका धावसंख्येसह गेला. त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. यामध्ये खास म्हणजे, हा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त एका धावेची आवश्यकता होती, जी त्याने पहिल्याच चेंडूवरच गाठली आणि इतिहास रचला.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० धावा पूर्ण करताच विराट कोहली हा टप्पा गाठणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा होता, ज्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये २१,९९९ धावा फटकावण्याची किमया साधली होती. शिवाय, विराट कोहली लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील केवळ नववा फलंदाज बनला आहे. किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय दिग्गजांमध्ये आपले स्थान आणखी बळकट केले आहे.
सामन्याबाबत सांगायचे झाले तर, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत आंध्रने ५० षटकांत ८ गडी गमावून २९८ धावा फटकावल्या. आंध्रकडून रिकी भुईने १२२ धावा करत शानदार शतक लगावले. दिल्लीकडून सिमरजीत सिंगने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट घेतल्या, तर प्रिन्स यादवने ३ विकेट काढल्या.






