फोटो सौजन्य - सोशल मिडिया
विजय हजारे ट्राॅफीचे सामने सध्या सुरु आहेत, या स्पर्धेमध्ये भारताचे अनेक दिग्गज खेळाडू सामील झाले आहेत. सोशल मिडियावर सध्या विजय हजारे ट्राॅफीच्या सामन्यांची त्याचबरोबर खेळाडूंना केलेल्या कामगिरीची मोठी चर्चा रंगली आहे. काल भारताचा स्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी त्याच्या संघासाठी शतके झळकावली. त्याचबरोबर वैभव सुर्यवंशी याने देखील देशांतर्गत सामन्यांमध्ये देखील धूमाकुळ घातला.
ओडिशाचा फलंदाज स्वस्तिक सामलने विक्रमी विक्रमात आपले नाव कोरले आहे. बुधवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध स्वस्तिक सामलने द्विशतक झळकावले. त्याने १६९ चेंडूत २१२ धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावणारा सामल ओडिशाचा पहिला फलंदाज ठरला.
स्वस्तिक सामंतने स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या केली. सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओडिशाने लवकरच तीन विकेट गमावल्या. त्यानंतर स्वस्तिक सामंतने कर्णधार बिप्लब सामंत्रेसह डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी २६१ धावांची भागीदारी केली. सामंतरेने ९१ चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह १०० धावा केल्या. सामलने १६९ चेंडूत २१ चौकार आणि आठ षटकारांसह २१२ धावा केल्या. त्यांच्या भागीदारीच्या जोरावर ओडिशाने ५० षटकांत सहा बाद ३४५ धावा केल्या.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावणारा स्वस्तिक सामल आठवा फलंदाज ठरला. स्वस्तिकचा जन्म २७ जुलै २००० रोजी ओडिशातील कोरापूट येथे झाला. त्याने १२ प्रथम श्रेणी सामने, १० लिस्ट ए सामने आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत. सामलला आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावासाठी देखील निवडण्यात आले होते, परंतु तो विकला गेला नाही.
Pure class & dominance 💪
Swastik Samal’s double hundred lights up the scoreboard in Vijay Hazare Trophy ✨ pic.twitter.com/6hXQ4TY3HY — CricTracker (@Cricketracker) December 24, 2025
तथापि, स्वस्तिक सामलचे द्विशतक ओडिशासाठी पुरेसे नव्हते. समर गज्जर (१३२*) यांच्या शानदार शतक आणि चिराग जानी (८६) आणि विश्वराज जडेजा (५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सौराष्ट्राने ओडिशाचा पाच विकेट्सने पराभव केला. सौराष्ट्राने ४८.५ षटकांत पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह सौराष्ट्राला चार गुण मिळाले.






