Vinesh Phogat and Bajrang Punia to Contest Assembly Elections from Haryana and Meet Congress High Command Rahul Gandhi
Vinesh Phogat and Bajrang Poonia Likely to Contest Assembly Elections from Haryana : विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात केली होती. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेश फोगटने चार वेळा विश्वविजेती आणि गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूचा पराभव केला. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही दमदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, अधिक वजनाचे कारण देत तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. आता ती राजकीय आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे. त्यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अंतिम फेरीत तिला बाद ठरवण्यात आले होते. विनेशचे 100 वजन अधिक भरल्याचे कारण देत तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते. हा वाद चांगलाच गाजला. यानंतर हरियाण खापने तिला गोल्डमेडल देऊन गौरव केला होता. यामध्येच विनेशने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. आता विनेश राजकीय आखाड्यात आपले नशीब आजमवणार आहे. तिने काँग्रेस हायकमांडची भेट घेतली आहे. तिच्यासोबत बजरंग पुनियादेखील होता. दोघांनी मिळून काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे समजले आहे.
सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू
2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतली. या भेटीनंतर दोघेही निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे. उल्लेखनीय आहे की बजरंग पुनिया आणि विनेश फोगट निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. 2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सर्व पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतली आहे. या भेटीनंतर दोघेही निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे.
उमेदवारांबाबत काँग्रेसचे विचारमंथन सुरू आहे
2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी काँग्रेस आपल्या उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करीत आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने बैठका घेत आहे. सोमवारी काँग्रेसच्या सीईसी बैठकीत 49 जागांवर विचारमंथन झाले, ज्यामध्ये 34 जागांवर नावे निश्चित करण्यात आली. त्याचवेळी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही काँग्रेस सीईसीची बैठक सुरूच होती.
काँग्रेस विजयी उमेदवाराच्या शोधात
हरियाणा सीईसी बैठकीसाठी उमेदवार त्यांच्या विजयाच्या संभाव्यतेच्या आधारावर निवडले जात आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अंतिम यादीत विजयी उमेदवारांच्या नावांचा समावेश केला आहे. पक्षाच्या स्क्रिनिंग समितीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि भूपेंद्र हुडा यांसारख्या दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात
विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरुवात केली होती. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेश फोगटने चार वेळा विश्वविजेती आणि गेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूचा पराभव केला. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही दमदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
गोल्ड मेडलची होती प्रबळ दावेदार
विनेश फोगटची कामगिरी पाहता ती सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र, फायनलच्या दिवशी वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. महिलांच्या 50 किलो वजनी कुस्ती स्पर्धेत विनेश सुवर्णपदक जिंकणार हे निश्चित मानले जात होते. मात्र 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आले.