फोटो सौजन्य - X
विराट कोहली व्हिडीओ : भारताचा स्टार विराट कोहली याने टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली. त्याधी तो मुंबई विमानतळावर त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसला होता. त्यानंतर आज सकाळी प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी वृंदावन येथे गेला होता. वृंदावन येथील व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीने प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेतले आहे आणि हे पहिल्यादाच नाही तर विराट हा याआधी प्रेमानंद महाराज याचे दर्शन घेण्यासाठी पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत आला होता.
आता आणखी एक फोटो सोशल मीडियावर आजचा वृंदावन येथील व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहलीच्या हातामध्ये माळा जाप करण्याचे यंत्र आहे आणि तो प्रेमानंद महाराज यांच्या येथे गेल्यानंतर तो सध्या माळा जाप करताना पाहायला मिळत आहे. विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमानंद महाराजांसोबतच्या भेटीचा व्हिडिओ यूट्यूबवर समोर आला. व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी स्वतःला साष्टांग दंडवत घालून प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर महाराजांनी विरुष्काला जीवनात आनंद मिळविण्यासाठी राधा-राधा जप करण्याचा सल्ला दिला.
Virat Kohli & Anushka Sharma से पूज्य महाराज जी की क्या वार्तालाप हुई ? Bhajan Marg pic.twitter.com/7IWWjIfJHB
— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) May 13, 2025
विराट कोहलीने या वर्षी ३ ते ५ जानेवारी दरम्यान सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. बीजीटी २०२४-२५ मालिकेतील ही शेवटची कसोटी होती, ज्यामध्ये कोहलीची फलंदाजी अपयशी ठरली. त्याने दोन्ही डावात मिळून २३ धावा केल्या. या कसोटीपासून कोहलीच्या कसोटी निवृत्तीबद्दल अटकळ बांधली जात होती. पण तरीही कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाईल असे मानले जात होते, पण त्याने सर्वांच्या आशा मोडल्या.
SA VS AUS : दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सज्ज! अंतिम सामन्यासाठी संघ जाहीर
आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल २०२५ १७ मे पासून पुन्हा सुरू होईल. पहिला सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील सीमा तणावामुळे आयपीएल थांबवावे लागले. आता भारत-पाकिस्तान युद्धबंदीमुळे लीग पुन्हा सुरू होत आहे. सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील, जो आतापर्यंत ११ सामन्यांत ५०५ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे.