इंग्लंडच्या बर्लिंगहम येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने विविध क्रीडा प्रकारात ६१ पदकांची कमाई केली आहे. यात भारताने एकूण २२ सुवर्ण १६ रौप्य २३ कांस्य पदक पटकावले. भारत ६१ पदक मिळवून पदक तालिकेत चौथ्या स्थानावर राहिला आहे. देशाला पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंवर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जात असून आता क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) देखील राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.
विराट कोहलीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, ‘तुम्ही सर्वांनी देशाचा गौरव केला आहे. आपल्या सर्व पदक विजेत्यांचे आणि CWG 2022 मधील सहभागींचे अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे. जय हिंद.’ भारताने यावेळी ६१ पदके जिंकली.
जरी भारताला गोल्ड कोस्ट गेम्समधून पदकांची संख्या ओलांडता आली नसली तरी, नेमबाजीची अनुपस्थिती असूनही, या हंगामात भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताने अंतिम दिवशी ४ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवून ही स्पर्धा पूर्ण केली. २०१० मध्ये, जेव्हा हे खेळ घरच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते, तेव्हा भारतासाठी एकूण १०१ पदके होती.
You have brought great laurels for our country. Congratulations to all our winners and the participants of CWG 2022. We are so proud of you. Jai Hind ??? pic.twitter.com/phKMn7MMdY
— Virat Kohli (@imVkohli) August 9, 2022
भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाकडून ७-० असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कुस्तीमध्ये भारताने ६ सुवर्णांसह एकूण १२ पदके जिंकली. विनेश फोगट, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दहिया, साक्षी मलिक आणि नवीन यांनी आपल्या खात्यात सुवर्णपदकांची नोंद केली.