आयसीसीचे माजी पंच रुडी कोर्टझेन (Rudi Koertzen) यांचा मंगळवारी कार अपघातात मृत्यू झाल्याने क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गोल्फमधून परतत असताना कार अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त त्यांच्या मुलाने सांगितले. त्यांचे नाव क्रिकेटमधील (Cricket) महान पंचांपैकी एंक आहे. जगातील महान क्रिकेट पंचांपैकी एक असलेल्या कोर्टझेन यांच्या सन्मानार्थ, दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्या पुढच्या सामन्यात हातात काळी पट्टी बांधून मैदानात उतरेल होते. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने देखील माजी पंच रुडी कोर्टझेन यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
वीरेंद्र सेहवागने (Virendra sehwag) ट्विटरवर फोटो शेअर करत रुडी कोर्टझेन यांच्या सोबत अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
Virender Sehwag’s emotional post after former umpire Rudy Kortzen’s death
सेहवागचे भावनिक ट्विट :
“रुडी कॉर्टझेनच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्याशी त्याचे चांगले संबध होते. जेव्हा मी जोरदार बॅटींग करायचो तेव्हा ते मला सांगायचे की व्यवस्थित आणि टिकून खेळ कारण त्यांना माझी बॅटींग अधिक काळ बघायची असत. “एकदा त्यांना आपल्या मुलासाठी क्रिकेट पॅडचा एक खास ब्रँड विकत घ्यायचा होता. त्यांनी मला त्याबद्दल विचारले. त्यामुळे मी त्यांना एक पॅड भेट म्हणून दिले ज्याबद्दल ते खूप आनंदी होते. एक सज्जन आणि एक अतिशय अद्भुत माणूस होते. रुडीला तुझी आठवण येईल.” अशा भावना सेहवाग याने व्यक्त केल्या आहेत. युवराज सिंह यानेही आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
And enquired about it from me. I gifted him and he was so grateful . A gentleman and a very wonderful person. Will miss you Rudi. Om Shanti pic.twitter.com/gdSHGOoYg8
— Virender Sehwag (@virendersehwag) August 9, 2022
युवराज सिंहनेही व्यक्त केला शोक :
युवराज म्हणाला, “रुडी कोर्टझेन यांचे आकस्मिक निधन झाल्याची दुःखद बातमी. तो एक हुशार व्यक्ती होता आणि खेळातील सर्वोत्कृष्ट पंचांपैकी एक होता, जो त्याच्या तीक्ष्ण निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. त्यांच्या कुटुंबियांना आणि हितचिंतकांना माझ्या मनापासून संवेदना. ”
Tragic news of the sudden passing away of Rudi Koertzen. He was a gifted individual and one of the finest umpires the game has witnessed, known for his sharp decision making abilities.
My deepest condolences to his family and well wishers ?? #RudiKoertzen pic.twitter.com/9mV1V09F7a
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) August 9, 2022