मोहम्मद हाफीज आणि युवराज सिंग(फोटो-सोशल मीडिया)
WCL 2025 : इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धा सुरु आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान(India vs Pakistan)सामन्याची चर्चा रंगली आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघ आधीच सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता या दोन्ही संघांमधेय सेमीफायनल सामना होणार असल्याची शक्यता आहे. परंतु भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील तणावामुळे हा सामना होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाला तर त्यापुढे काय?
यापूर्वीच, लीग स्टेज सामन्यात भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार होते.परंतु, वादामुळे तो रद्द करण्यात आला होता. अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला हे की जर हा सामना देखील रद्द झाला तर यामध्ये कोणाला फायदा होईल? याबद्दल आपण जाणून घेऊया.
लीग टप्प्यामध्ये भारतीय खेळाडूंकडून अचानक आपली नावे मागे घेण्यात अली होती. त्यानंतर इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील होऊ शकला नाही. त्याला रद्द करण्यात आला होता.. आता जर सेमीफायनल दरम्यान देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली, तर सध्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला पाकिस्तान संघाला फायदा होऊन तो संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्याची शक्यता जास्त आहे.
तर टीम इंडियाचा या स्पर्धेतील प्रवास त्याच टप्प्यावर संपुष्टात येईल. जो भारतासाठी मोठा फाटक मानला जाईल. तथापि, या संकटाला तोंड देण्यासाठी स्पर्धा आयोजकांकडे पर्यायी योजना असण्याची शक्यता आहे. ही गुंतागुंतीची परिस्थिती टाळण्यासाठी ते पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य सामना आयोजित करण्याचा निर्णय होऊ शकतो.
त्याचप्रमाणे, भारताला या दोन्ही संघांपैकी कोणत्याही एका संघाविरुद्ध उपांत्य फेरी खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. जेणेकरून स्पर्धेचा उत्साह कायम राहण्यात मदत होईल. जर, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही सण संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले तर, परिस्थिती पुन्हा एकदा बिकट होण्याची शक्यता आहे. कारण, दोन्ही संघांमधील तणावपूर्ण वातावरण जास्त चर्चेत आहे, त्याबाबत आता बातम्या देखील झळकत आहेत. या परिस्थितीत, आयोजकांना अधिक काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत.