अहमदाबाद – सध्या भारतात सर्वंत्र क्रिकेटमय वातावरण झालं आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप (Cricket World Cup 2023) स्पर्धेचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. काल झालेल्या सामन्यात पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या कांगारुंना दक्षिण आफ्रिकेनं धूळ चारली. यानंतर आज विश्वचषकातील 11 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश (New Zealand-Bangladesh) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. तर स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना उद्या (शनिवारी) भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात होणार आहे. या सामन्याची तिकिट काही दिवसांपूर्वी काही तासातच विकली गेली आहेत, तर अहमदाबादमधील हॉटेल्स मोठ्या प्रमाणात बुक झाली आहेत. दुसरीकडे भारत-पाक सामन्यामुळं सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. तसेच आज आणि उद्या मोठी वाहतूक कोंडी देखील होणार आहे. आता या मॅचबाबत क्रिकेटप्रेमीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. (Western Railway Special Train for India-Pakistan Match; When and where will the train leave? How to get tickets)
विश्वचषक स्पेशल ट्रेन…
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सामना नरेंद्र मोदी, स्टेडिअम, अहमदाबाद येथे होणारर आहे. हा सामना डे-नाईट असून, सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. या सामन्याची क्रिकेटप्रेमीना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत. तसेच जगभरातील क्रीडाप्रेमीचे लक्ष उद्याच्या सामन्याकडे असणार आहे. दरम्यान, या मॅचसाठी पश्चिम रेल्वेनं विशेष ट्रेन (Spacial Trains) चालवण्याची घोषणा केली. मात्र, काल पहिल्या विशेष ट्रेनची सर्व तिकिटं अवघ्या 17 मिनिटांत फुल्ल झाली. त्यामुळं ज्यांना ही मॅच पाहण्यासाठी जायचे होते, त्यांचा मूड ऑफ झाला आहे.
ट्रेन कुठून व किती वाजता सुटणार?
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष ट्रेन आज (शुक्रवारी) रात्री 11.20 वाजता मुंबई सेंट्रल इथून सुटणार असून उद्या (शनिवारी) सकाळी 7.20 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. या विश्वचषक स्पेशल ट्रेनची क्षमता 1531 आसनांची आहे. तर ट्रेन क्रमांक 09013/09014 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल दरम्यान धावेल. ट्रेन क्रमांक 09013 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई सेंट्रल येथून 21.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.30 वाजता अहमदाबादला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 09014 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल स्पेशल अहमदाबादहून रविवार, 15 ऑक्टोबर 2023 रोजी 4 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन येथे थांबा घेणार आहे.