फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा T२० सामना : पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभूत झाला आणि इंग्लंडने मालिकेत पुनरागमन केले. सध्या मालिकेमध्ये भारताच्या संघाकडे २-१ अशी आघाडी आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पुढील सामना पुण्यात खेळवला जाणार असून, या मालिकेत भारतीय संघाच्या नजरा सीरिज जिंकण्यासाठी असतील तर इंग्लंड बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पुण्याची काळ्या मातीची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. यावेळी भारताच्या कोणत्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.
पुण्यामधील खेळपट्टीचा फिरकीपटूंना फायदा होईल त्याचबरोबर सुरुवातीला फलंदाजांना देखील मदत होऊ शकते. पण जसजसा खेळ पुढे जातो तसतसा तो अधिक फिरकीला अनुकूल बनतो. भारताने गेल्या दोन सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर खेळले आहेत. दोन सामन्यांत केवळ दोनच षटके टाकल्याने सुंदरला खेळवणे अनाकलनीय आहे. चेन्नईत त्याने फलंदाजीने धावा निश्चित केल्या, पण राजकोटमध्ये तो उंच फलंदाजी करूनही अपयशी ठरला. कोलकाता आणि चेन्नईमध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शामीच्या जागी अर्शदीपला राजकोटमध्ये वगळण्यात आले.
मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्माच्या नात्यावर अभिनेत्रीच्या आईने केला खुलासा
पुण्यात भारतीय संघ रचनेत बदल होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू सिंग तंदुरुस्त असून तो पुण्यात खेळणार असल्याची खात्री आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी आलेल्या ध्रुव जुरैलला वगळले जाऊ शकते. तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अर्शदीप सिंगला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. जर आपण पुण्यातील भारतीय विक्रमाबद्दल बोललो तर भारतीय संघाने येथे चार टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत.
भारतीय संघ २०१२ मध्ये येथे इंग्लंडविरुद्ध सामना खेळला होता, ज्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, इंग्लंड संघाने याआधीच एका सामन्यात विजयाची चव चाखली आहे, अशा स्थितीत संघ आणखी धोकादायक ठरतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. या मालिकेवर नजर टाकली तर कोलकात्यात खेळलेला पहिला T२० आंतरराष्ट्रीय सामना भारताने सात गडी राखून जिंकला होता. त्यानंतर चेन्नईमध्ये यजमान संघाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आणि दोन विकेट राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. राजकोटमध्ये इंग्लिश संघाने जोरदार पुनरागमन करत २६ धावांनी विजय मिळवत मालिकेतील अंतर १-२ असे कमी केले.
T२० मालिकेचे अजुनपर्यत दोन सामने शिल्लक आहेत. त्यानंतर भारताचा संघ तीन सामान्यांची इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही भारताच्या संघासाठी चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी एकमेव एकदिवसीय मालिका असणार आहे. यामध्ये भारताच्या संघाला चांगली कामगिरी करणे अनिवार्य आहे.