Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wimbledon 2026: कोण आहे Arnav Paparkar? Wimbledon मध्ये चमकला भारतीय तारा, 36 वर्षांची प्रतिक्षा संपली

भारताच्या अर्णव पापरकरने इंग्लंडच्या तिसऱ्या ग्रँड स्लॅम, विम्बल्डनच्या मुलांच्या एकेरी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली असून, गेल्या ३६ वर्षांत अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 09, 2026 | 12:59 PM
कोण आहे अर्णव पापरकर (फोटो सौजन्य - X.com)

कोण आहे अर्णव पापरकर (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • पहिला भारतीय टेनिसपटू विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत 
  • अमेरिकन खेळाडूचा केला पराभव 
  • भारतीयांसाठी अभिमानाची बाब 
युवा भारतीय टेनिसपटू अर्णव पापरकर विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. हा १८ वर्षीय खेळाडू मुलांच्या एकेरीमध्ये खेळत आहे. तिसऱ्या फेरीत त्याचा सामना जपानच्या रयो ताबाटाशी झाला. भारतीय खेळाडूने हा सामना ६-२, ६-२ असा सहज जिंकला. दुसऱ्या फेरीत अर्णवने तिसऱ्या मानांकित अमेरिकन खेळाडू कीटन हेन्सचा पराभव केला होता.

याआधी लिएंडर पेस हे नाव विम्बल्डनमध्ये गाजले होते आणि हा मान त्याला ३६ वर्षांपूर्वी मिळाला होता. आता सर्वच चाहत्यांचे मराठमोळ्या अर्णव पापरकरच्या खेळाकडे लक्ष लागून राहिले आहे. अर्णव सध्या केवळ १८ वर्षांचा आहे आणि उपांत्य फेरीत पोहचल्याने आता देशाच्या सर्व आशा त्याच्यावर आहेत.

Wimbledon 2026: Novak Djokovic विम्बल्डनचा ‘बादशाह’, 39 वर्षीही सर्वात दीर्घ Quarter Final केली नावावर

लिएंडर पेस शेवटचा पोहोचला होता

विम्बल्डनच्या मुलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून ३६ वर्षे झाली आहेत. अर्णव पापकरच्या आधी, महान भारतीय खेळाडू लिएंडर पेसने १९९० मध्ये ही कामगिरी केली होती. पेसने वयाच्या १७ व्या वर्षी ती स्पर्धा जिंकली होती. आता, उपांत्यपूर्व फेरीत मराठमोळ्या अर्णव पापकरचा सामना अमेरिकन क्वालिफायर जॉर्डन लीशी होईल.

अर्णव पापकर कोण आहे?

मराठमोळा अर्णव पापकर हा पुण्याचा टेनिसपटू असून सध्या आयटीएफ ज्युनियर क्रमवारीत तो १९ व्या क्रमांकावर आहे. ६ फुटांपेक्षा जास्त उंची असलेला हा १८ वर्षीय खेळाडू, हेमंत बेंद्रे टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक प्रोसोनजीत पॉल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतो. तो स्पेनमधील सोटो अकादमीमध्ये प्रशिक्षक नायजेल बीव्हर्स यांच्या मार्गदर्शनाखालीही प्रशिक्षण घेतो. अर्णव पापरकरला २०२३ मध्ये पहिले मोठे यश मिळाले, जेव्हा त्याने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन अंडर-१४ एशिया-पॅसिफिक एलिट ट्रॉफी जिंकली.

अर्णवची कारकिर्दीतील कामगिरी

अर्णव पापरकर २०२३ मध्ये वाईल्डकार्ड क्वालिफायर म्हणून प्रवेश करून राष्ट्रीय अंडर-१६ चॅम्पियन बनला. त्याने २०२४ मध्ये आपल्या १६ व्या वाढदिवशी एटीपी चॅलेंजरमध्ये पदार्पण केले. २०२५ मध्ये, त्याने बहरीनमधील आयटीएफ जे६० मनामा आणि जे२०० क्वालालंपूर येथे आपली पहिली मोठी आंतरराष्ट्रीय ज्युनियर विजेतेपदे जिंकली. या वर्षाच्या सुरुवातीला, तो एआयटीए बॉईज अंडर-१८ राष्ट्रीय क्रमांक १ बनला आणि सलग २१ आठवडे अव्वल स्थानी राहिला. त्याने २०२६ च्या फ्रेंच ओपन ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिसरी फेरी गाठली.

Wimbledon 2026: मोठा उलटफेर! ओसाकाचा सुपर शो; नंबर-1 सबालेंकाचा पराभव, सिनर सलग पाचव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये

Web Title: Who is arnav paparkar 1st indian in 36 years reached to wimbledon boys single quarter finals pride moment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Sports News
  • Wimbledon

संबंधित बातम्या

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
1

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

‘Hockey स्पर्धेत उडाली खळबळ! फायनलच्या ट्रॉफीवर कोण कोरणार नाव? झारखंड की हरियाणा?
2

‘Hockey स्पर्धेत उडाली खळबळ! फायनलच्या ट्रॉफीवर कोण कोरणार नाव? झारखंड की हरियाणा?

आता थांबायचं नाही! Olympic 2036 साठी भारताचा ‘मास्टर प्लॅन’; हॉकीचा चेहरामोहरा बदलणार
3

आता थांबायचं नाही! Olympic 2036 साठी भारताचा ‘मास्टर प्लॅन’; हॉकीचा चेहरामोहरा बदलणार

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा
4

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.