नोव्हाक जोकोविचची उपांत्य फेरीत धडक (फोटो सौजन्य - X.com)
Wimbledon 2025 : Novak Djokovic चा जलवा कायम! डे मिनौरचा पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी
विम्बल्डनचा सर्वात दीर्घ उपांत्यपूर्व सामना
My longest Wimbledon match ever. An unforgettable nightshift 💪 pic.twitter.com/q0D10PVwFw — Novak Djokovic (@DjokerNole) July 7, 2026
नोव्हाक जोकोविच आणि फेलिक्स ऑगर-अलियासिम यांच्यातील सामना ५ तास आणि १५ मिनिटे चालला. हा विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वात दीर्घ उपांत्यपूर्व सामना आहे. तसेच, हा जोकोविचच्या विम्बल्डन कारकिर्दीतील सर्वात दीर्घ सामना होता आणि आपल्या पोस्टमध्येही त्याने तसंच लिहिलं आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोविचला अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या सेटदरम्यान त्याला पोटरीला दुखापत झाली, परंतु असे असूनही, त्याने हार मानली नाही आणि एक उल्लेखनीय पुनरागमन केले.
उपांत्य फेरीत सामना सिनरशी
विद्यमान विम्बल्डन विजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या यानिक सिनरने जॅन-लेनार्ड स्ट्रफवर ७-५, ७-६, ६-३ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत सिनरचा सामना सात वेळचा चॅम्पियन नोव्हाक जोकोविचशी होईल. इटलीचा सिनर आणि जोकोविच यांच्यात आतापर्यंत ११ सामने झाले असून, त्यात सिनरने ६-५ अशी आघाडी घेतली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविचने सिनरला पराभूत केले होते. तथापि, गेल्या वर्षीच्या विम्बल्डन उपांत्य फेरीसह तो मागील पाच सामने हरला होता.
लंडन येथील ऑल-इंग्लंड लॉन टेनिस क्लबमध्ये पहिला सेट गमावल्यानंतर आणि दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच ब्रेकने मागे पडल्यानंतर, स्ट्रफने आपली आक्रमकता वाढवली. त्याने आपल्या शक्तिशाली फोरहँडचा आणि नेटजवळच्या योग्य हालचालींचा वापर करून सिनरला अडचणीत आणले.
नोव्हाक आणि विराटची मैत्री
क्रिकेट आणि टेनिस हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी आहेत. क्रिकेटचा दिग्गज विराट कोहली आणि सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच हे चांगले मित्र आहेत. सध्या विम्बल्डनमध्ये सहभागी असलेल्या जोकोविचने लवकरच भारताला भेट देऊन कोहलीसोबत क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
जोकोविच जिओस्टारवर म्हणाला, “मला विराट कोहलीसोबत क्रिकेट आणि टेनिस खेळायला खूप आवडेल. मी लवकरच भारतात येण्याची योजना आखत आहे. आम्ही त्याबद्दल बोलत आहोत. मला माहीत आहे की विराट एक जागतिक स्टार आहे, पण विशेषतः भारतात तो अप्रतिम आहे. त्याने माझे आदरातिथ्य करावे आणि मला फिरवून आणावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल आणि भारतीय क्रिकेटबद्दल खूप आदर आहे.”
नोव्हाकने पुढे सांगितले की, “मी सर्बियाचा आहे, जिथे क्रिकेट हा फार मोठा खेळ नाही. पण माझ्या संघातील काही खेळाडू ब्रिटिश आहेत आणि त्यांना क्रिकेट खूप आवडते. त्यामुळे मी गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा खेळ शिकत आहे. मला अजूनही माझ्या क्रिकेट कौशल्यावर काम करायचे आहे. कदाचित विराट मला माझ्या तंत्रात आणि बॅट स्विंगमध्ये मदत करू शकेल. माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आणि कौतुक आहे. मला त्याला त्याच्या देशात, भारतात भेटायला आवडेल.”






