फोटो सौजन्य - X
Which player will take Virat Kohli’s fourth spot? : भारताचा संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. यामध्ये आता रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताचे कर्णधारपद कोण सांभाळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. सध्या टीम इंडियाचे T२० चे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे तर आता कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही रिटायरमेन्टची घोषणा सोशल मीडियावर केली होती. भारताचा संघ इंग्लडविरुद्ध पहिला कसोटी सामना २० जून ते २४ जून रोजी खेळवला जाणार आहे. सोमवारी विराट कोहलीने लाखो क्रिकेट चाहत्यांचे मन मोडले. आता भारतीय संघामध्ये विराट कोहलीच्या जागेवर कोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
कोहलीने त्याच्या आवडत्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराटने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्याने सर्वजण नाराज आहेत. पण मोठा प्रश्न असा आहे की कसोटी संघात किंग कोहलीची जागा कोण घेईल? चौथ्या क्रमांकावर कोहलीसारखा कहर करणारा फलंदाज कोण असेल? विराटच्या जागी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी चार दावेदार असल्याचे दिसते. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच्या जागेवर केएल राहुल खेळला होता तर आता सलामीवीर फलंदाज म्हणून संघामध्ये कोणाला स्थान मिळणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
लॉरा वोल्वार्डचे स्थान धोक्यात, स्मृती मानधना फलंदाजांच्या यादीत नंबर वन होण्याच्या जवळ
विराट कोहलीनंतर, चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी केएल राहुल हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे दिसते. राहुलकडे अनुभव आहे आणि त्याच्याकडे दबावाच्या परिस्थितीतून संघाला बाहेर काढण्याची क्षमता देखील आहे. राहुलने यापूर्वीही मधल्या फळीत खेळला आहे. राहुलने चौथ्या क्रमांकावर दोन डाव खेळले आहेत आणि या काळात त्याने १०८ धावा केल्या आहेत. बऱ्याचदा राहुल सलामीवीर फलंदाज त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या स्थानावर त्याला खेळवण्यात आले आहे. कोहलीच्या निवृत्तीमुळे, सरफराज खानसाठी टीम इंडियाचा मार्ग मोकळा झाला आहे. संघ व्यवस्थापन कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर सरफराजला आजमावू शकते.
विराटच्या जागी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी शुभमन गिल हा देखील एक चांगला पर्याय असल्याचे दिसते. गिलने आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली असेल, पण तो या स्थानावरही फलंदाजी करू शकतो. गिलच्या फलंदाजीतून तो संयम आणि वर्ग दिसून येतो, जो त्याला या स्थितीत मोठे यश देऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२५ मध्ये भरपूर धावा करणाऱ्या साई सुदर्शनची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड होऊ शकते. सुदर्शनने आयपीएलमध्ये सलामी दिली आहे, पण संघ व्यवस्थापन त्याला चौथ्या क्रमांकावर संधी देऊ शकते. आक्रमक फलंदाजीसोबतच सुदर्शनच्या फलंदाजीत संयमही दिसून आला आहे.