सध्या भारतीय संघात विकेटकीपर आणि फलंदाजीची जबाबदारी चोख बजावणारा दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये खूप प्रसिद्ध होत आहे. त्याची फॅन फॉलोइंग देखील दिवसेंदिवस वाढत असून त्याच्या स्फोटक फलंदाजी सह दिनेश कार्तिकच्या आगळ्यावेगळ्या हेल्मेटची विषयी देखील बरीच चर्चा सुरु आहे. कार्तिकचे निळ्या कलरचे हेल्मेट हे इतर खेळाडूंच्या हेल्मेट प्रमाणे नसल्याने त्याच्या चाहत्यांच्या नजरा या हेल्मेटवरच असतात.
मात्र दिनेश कार्तिक हा इतरांपेक्षा हटके दिसणारे हेल्मेट का घालतो याचे कारण आता समोर आलं आहे. दिनेश कार्तिक जे हेल्मेट वापरतो ते बेसबॉल किंवा अमेरिकन फुटबॉल टूर्नामेंटमध्ये घातलेल्या हेल्मेटसारख आहे. कार्तिकचे हेल्मेट हे गोल असून त्याच्या हेल्मेटला छोटी छिद्र आहेत. हे हेल्मेट अगदी वेगळे आणि वजनाने हलके आहे. दिनेश कार्तिक सुरुवातीपासूनच हलक्या हेल्मेटला प्राधान्य देताना दिसतो. कारण त्याला फलंदाजीसोबतच विकेटकीपिंगही करावी लागते. विशेष म्हणजे या हेल्मेटवर लहान छिद्रे आहेत, ज्याच्या मदतीने हवा खेळती राहून आणि घामाने भिजण्याचा प्रश्न येत नाही.
दिनेश कार्तिकचं हेल्मेट इतर हेल्मेट पेक्षा डोक्यावर चांगलं फीट होतं. जुन्या काळातील इंग्लंडचे माजी फलंदाज जेम्स टेलर, मायकेल कॅरबेरी तसेच श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा देखील अशा प्रकारचे हेल्मेट वापरायचे.