फोटो सौजन्य - JioHotstar Reality
सलमान खानचा रिअॅलिटी शो “बिग बॉस १९” सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये दररोज नवीन ट्विस्ट आणि वळणे पाहायला मिळतात. मागील आठवड्यापासून नव्या वाइल्ड कार्ड सदस्याची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर वीकेंड का वार या कार्यक्रमात दिसणार आहे. निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे ज्यामध्ये दीपक चहर सलमान खानसोबत बिग बॉस १९ च्या स्टेजवर दिसत आहे. दोघांनी स्टेजवर क्रिकेटही खेळले, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दीपक चहर बिग बॉस १९ मध्ये का आला आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. बिग बॉस १९ च्या सोशल मिडियावर एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघामधील वेगवान गोलंदाज दिपक चाहर सलमान खानसोबत स्टेजवर पाहायला मिळाला. दिपक चाहर हा बिग बाॅसच्या घरामध्ये एन्ट्री करणार आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
दीपक चहरची बहीण मालती चहर ही बिग बॉस १९ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. म्हणूनच दीपक चहर देखील त्याच्या बहिणीला प्रोत्साहन देताना दिसणार आहे. दीपक चहर बिग बॉस १९ च्या मंचावर येताच, सलमान खानने घोषणा केली की घरात एका नवीन वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होण्याची वेळ आली आहे. दीपक चहरची बहीण मालती आता इतर स्पर्धकांसह स्पर्धा करताना दिसणार आहे.
दीपक चहरने स्टेजवर येताच प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या आगमनाने बिग बॉस १९ चा स्टेज क्रिकेटच्या मैदानात रूपांतरित झाला. सलमान खान आणि दीपक चहर स्टेजवर क्रिकेट खेळताना दिसले. त्यांचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खान आणि दीपक चहर यांच्यातील हा मजेदार क्षण चाहत्यांना खूप आवडला आहे.
Weekend Ka Vaar par aaye @deepak_chahar9, dene apne opinions, dekhte hai kya hai unke conclusions! 🙄 Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @ColorsTV par. Watch Now:- https://t.co/XNlwzrEgyf pic.twitter.com/shP9FHJC1u — JioHotstar Reality (@HotstarReality) October 4, 2025
दरम्यान, YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. तो स्पर्धकांसोबत एक मजेदार खेळ खेळताना दिसेल. अमाल मलिक, नेहल चुडासमा, कुनिका सदानंद, अशनूर कौर, नीलम गिरी, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि झीशान कादरी यांना या आठवड्यात घराबाहेर काढण्यासाठी नामांकन देण्यात आले आहे. तथापि, अहवाल असे सूचित करतात की या आठवड्यात घराबाहेर काढले जाणार नाही, म्हणजेच कोणत्याही स्पर्धकाला घराबाहेर काढले जाणार नाही.