सौजन्य - BCCI India vs Bangladesh 2nd Test Team India took control of the draw match
IND vs BAN 2 Test 4 Day : भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना कानपूर येथे सुरू आहे. ग्रीन पार्कवर सुरु असलेल्या सामन्यावर पावसाचे सावट होतेच आणि झालेही तसचे दोन दिवस खेळ झालाच नाही. बांगलादेशने 107 धावांपासून खेळ सुरू केला होता. भारतीय संघाने 233 धावांवर बांगलादेशला रोखले. त्यानंतर भारताने वेगाने धावा करीत टेस्टमध्ये नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. सर्वाधिक जलद 50 धावा आणि 100 धावा ठोकल्या, हा टेस्टमधील नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे.
दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनने घेतल्या 2 विकेट
Make that two for #TeamIndia and R Ashwin 🔥🔥
Hasan Mahmud is O.U.T for 4.
Live – https://t.co/JBVX2gyyPf#INDvBAN | @IDFCFIRSTBank https://t.co/V7H8eD28gm
— BCCI (@BCCI) September 30, 2024
कर्णधार रोहित शर्माने इरादा केला स्पष्ट
पावसामुळे 2 दिवसाचा खेळ रद्द झाल्याने रोहित शर्माने आपला इरादा स्पष्ट केला होता. भारतीय संघाने टेस्ट असूनही वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, के एल राहुल, शुभमन गिल यांनी वेगवान धावा बनवल्या. यशस्वी जयस्वालने तर नवीन विक्रम आपल्या नावावर करीत 31 चेंडूमध्ये अर्धशतक आपल्या नावावर केले. केएल राहुलनेसुद्धा 43 चेंडूत 67 धावा ठोकल्या, तर विराटने 35 चेंडूत 47 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 35 ओव्हरमध्ये 285 धावा ठोकल्या. रोहित शर्माने 285 धावांवर डाव घोषित केला आणि बांगलादेशला फलंदाजीसाठी बोलावले. आता तर बांगलादेशला जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करणे गरजेचे राहणार आहे. अन्यथा त्यांच्या विकेट गेल्या तर सामना भारतीय संघाच्या बाजूने होणार आहे.
बांगलादेशच्या विकेट जर लवकर गेल्या तर भारतीय संघाला जिंकण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने तोच इरादा ठेवून डाव घोषित केल्याचे दिसू येत आहे. आज स्टेडियमवर चांगलाच सूर्यप्रकाश दिसून येत आहे. पिच चांगली कोरडी झाली आहे.
रवींद्र जडेजाने रचला इतिहास
बांगलादेशविरुद्धच्या ग्रीन पार्क कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी इतिहास रचला. बांगलादेशची शेवटची विकेट रवींद्र जडेजाने घेतली. यासोबत रवींद्र जडेजा एका खास क्लबमध्ये जाऊन बसला आहे. रवींद्र जडेजा कसोटीत टीम इंडियासाठी 300 बळी आणि 3000 धावा करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. जडेजाच्या आधी कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता जड्डूच्या नावावर हा पराक्रम झाल्याने दिग्गज अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जाऊन बसला.
दिग्गज कर्णधार कपिल देवच्या नावावर मोठा विक्रम
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये कपिल देव यांनी 5248 धावा केल्या आहेत आणि 434 बळीही घेतले आहेत. तर रविचंद्रन अश्विनच्या नावावर फलंदाजीत ३ हजार धावा आहेत. याशिवाय विकेट्सच्या बाबतीत त्याच्याकडे 500 हून अधिक बळींची नोंद आहे. या प्रकरणात अश्विन आता कसोटीतील महान भारतीय अष्टपैलू खेळाडू बनला आहे.
बांगलादेशचा डाव 233 धावांवर संपला.
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटीत रचला इतिहास
कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पावसामुळे सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत केवळ 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. चौथ्या दिवशी खेळ वेळेवर सुरू झाला आणि बांगलादेशने 3 गडी गमावून 107 धावांपर्यंत मजल मारली.