फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन फेब्रुवारीमध्ये केले जाणार आहे. या ट्रॉफीचे सामने कशाप्रकारे खेळवले जाणार यावरून बऱ्याच महिन्यांपासून वाद पाहायला मिळाला. त्यानंतर आयसीसीने जाहीर केले होते की आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे सामने हायब्रीड पद्धतीने खेळवले जाणार आहे त्याचबरोबर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीचे सामने दुबईमध्ये खेळणार आहे, तर उर्वरित संघ पाकिस्तानमध्ये सामने खेळणार आहे. आता चॅम्पियन ट्रॉफीचे सामने खेळलेल्या जाणाऱ्या स्टेडियमच्या संदर्भात नवा वाद पाहायला मिळत आहे याप्रकरणाचा संदर्भात सविस्तर वाचा.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे, जिथे ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन होत असले तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ताज्या प्रकरणात या स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. कारण या स्पर्धेचे सामने ज्या तीन स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत ते अद्याप तयार झालेले नाहीत.
Sunil Gavaskar Statement : बुमराहच्या कॅप्टन्सीवर सुनील गावस्कर यांचे मोठे वक्तव्य
या सर्व स्टेडियममधील काम गेल्या वर्षअखेरीस पूर्ण होणार होते, मात्र अद्याप तसे झालेले नाही. पाकिस्तानने स्टेडियम तयार करण्याची अंतिम मुदत चुकवली आहे, त्यानंतर संपूर्ण स्पर्धा दुसऱ्या देशात हलवली जाऊ शकते. आता या संपूर्ण प्रकरणावर पीसीबीचे वक्तव्य समोर आले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने पीसीबीच्या हवाल्याने म्हटले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि कराचीमधील नॅशनल बँक स्टेडियमचे बांधकाम अंतिम मुदतीमध्ये किंवा त्याच्या आसपास पूर्ण केले जाणार आहे.
याआधी बुधवारी पाकिस्तानमधील अनेक सोशल मीडियावर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळले जाणार असल्याचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. यामध्ये लाहोर, कराची आणि रावळपिंडीच्या नावांचा समावेश आहे. एका स्टेडियममधील प्लास्टरचे कामही पूर्ण झाले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
Big Breaking: Pakistan might be lost the hosting rights of Champions Trophy 🏆 for the worst quality of stadium.#ChampionsTrophy2025
— Manoj Tiwari (@ManojTiwariIND) January 8, 2025
सूत्राने सांगितले की, ‘हे अतिशय निराशाजनक चित्र आहे. तिन्ही स्टेडियम अद्याप तयार नसून त्यामध्ये नूतनीकरणाचे काम सुरू नसून, बांधकाम सुरू आहे. स्टेडियममध्ये जागा, फ्लडलाइट्स, सुविधा आणि अगदी आऊटफिल्ड आणि मैदानासह बरेच काम करणे बाकी आहे. पाकिस्तानला ८ फेब्रुवारीपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत तिरंगी मालिका खेळायची आहे. यापूर्वी तिरंगी मालिका मुलतानमध्ये आयोजित केली जाणार होती परंतु आता तयारी पाहता पीसीबीने ती गद्दाफी स्टेडियम आणि नॅशनल बँक स्टेडियममध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.